Thursday, February 25, 2010

MARATHI SANSKRUTI

महाराष्ट्र

Maharashtra State of India

माझा महाराष्ट्र

महाराष्ट्र या नावातच सारं काही आलं!

महाराष्ट्र !

या राष्ट्रात विवधता अगदी ठासून भरलेली आहे!

इतिहास, निसर्ग, कला, साहित्य, पाककला ह्या सगळ्यात इतकं वैविध्य क्वचितच जगात आढळेल!

ह्या राष्ट्राची माती पवित्र आहे! ह्याच मातीतून शिवाजी, संभाजी जन्माला आले! ह्याच मातीत स्वराज्याचे बीज परले गेले! इथेच ते फळाला आले! इथेच अनेक अनामी वीर स्वराज्यासाठी लढले आणी कैक धारातीर्थी पडले! इथली माती त्यामुळेच लाल असेल का? माझा महाराष्ट्र

महाराष्ट्र संकीर्ण माहिती

Maharashtra State Information

सातपुडा
सह्याद्री - (उपरांगा : सातमाळा, अजिंठा डोंगर, हरिश्चंद्र

मोहोलेशे ते महाराष्ट्र

ह्यू एनत्संग या चिनी प्रवाशाने इ.स. ६४०-४१ च्या सुमारास महाराष्ट्रास भेट दिली होती. या देशाची संपत्ती, येथील प्रशासकीय कुशलता,

देवबांध

गेल्या वीस वर्षापासून ठाणे जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात देवबांध-नाशेरा या ठिकाणी सह्याद्री आदिवासी बहुविध सेवा संघाचा एक प्रकल्प चालू आहे.

संप्रदाय

Marathi Modi,Sahitya

शब्दाचा अर्थ - कधीं कधीं शब्द, पदें किंवा वाक्यें यांचा उपयोग त्यांच्या

जेजुरी

Jejuri Khandoba

हे ठिकाण महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुका

मराठी साहित्य प्रकाशने

जगभरातील मराठी प्रकाशकांचे पत्ते, दुरध्वनी क्रमांकांसह उपयुक्त माहिती

हरिश्चंद्रगड

ठाणे, पुणे आणि नगर यांच्या सीमेवर माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असणारा अजस्त्र पर्वत म्हणजे हरिश्चंद्रगड

श्रीवरदविनायक, महड

प्राचीन काळी विदर्भामध्ये कौंडिण्य नावाचे एक शहर होते. तेथे भीष्म नावाचा एक पराक्रमी आणि दानशूर

श्रीगणपतीची कहाणी

Mythological Stories of Ganapati

ऐका परमेश्वरा गणेशा, तुमची कहाणी, निर्मळ मळे,

नाणी

Maharashtra Historical Coins

कोल्हापूरनजीक सिंही येथे १९७१ साली आणि सातारा जिल्ह्यात सुलतानपूर येथे




Learn Marathi (मराठी) Language
Some short phrases

Words/phrases Transliteration Meaning
नमस्ते Namste. Hi/Hello
नमस्कार Namaskaar. Hi/Hello
तुम्ही कसे आहात? Tumhii kase aahaat? How do you do?
तू कसा आहेस? Tuu kasaa aahes? How are you (to a male)?
तू कशी आहेस? Tuu kashii aahes? How are you (to a female)?
आपण कसे आहात? Aapan kase aahaat? How are you (formal)?
तुम्हाला भेटून आनंद झाला Tumhaalaa bhe?uun aanand jhaalaa. Pleased to meet you.
पुन्हा भेटू Punhaa bhe?uu. Goodbye. ("We will meet again")
धन्यवाद Dhanyavaad. Thank you.
हो Ho. Yes.
नाही Naahii. No.
नको Nako. No, thank you.
किती? Kitii? How much?/How many?
कुठे? Ku?he? Where?
कसे? Kase? How?
केव्हा? Kevhaa? When?
कोण? Ko?? Who?
काय? Kaay? What?
शुभ रात्री shubh ratri Good night


विधी आणि संस्कार

कि. का. चौधरी

महाराष्ट्र(Maharashtra State,India)

भरतभूमीमधील इतर हिंदुधर्मीयांप्रमाणेच महाराष्ट्रातील हिंदूचे धार्मिक जीवन संस्कार नामक विविध धार्मिक विधी आणि परंपरांच्या भोवती गुंफलेले आहे. संस्कार म्हणजे यज्ञयागादी विधिद्वारे केलेली शुद्धिक्रिया. स्त्रिया आणि म्हणून संस्कार ह्यांच्यामधील सुप्त शक्तींना मूर्त स्वरूप देण्यास्तव त्याचप्रमाणे त्यांच्या आंतरिक परिवर्तनाचे बाह्य प्रतीक म्हणून संस्कार आवश्यक मानले जातात. उपनयनासारख्या काही संस्कारांनी आध्यामिक तद्‌वतच सामाजिक हेतू साध्य होतात. त्यामुळे वेदाभ्यासाचे द्वारे खुली होतात. आणि संस्कार करून घेणाऱ्या व्यक्तीस विशिष्ट सामाजिक अधिकार प्राप्त होऊन तीवर कर्तव्यपूर्तीचे बंधन घातले जाते. मनोवैज्ञानिकदृष्ट्या देखील संस्कारांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. जीवनात आपणास नवीन भूमिका वठवावयाची आहे, तसेच धर्माचरण विषयक नियमांचे पालन आपणास करावयाचे आहे, असे त्या वक्तीच्या मनावर बिंबविले जाते. त्याद्वारे आत्मोन्नतीचा मार्ग खुला होतो. नामकरण, अन्नप्राशन आणि निष्क्रमण ह्यांसारखे विधी व संस्कार प्रायः सामाजिक समारंभ स्वरूपाचे होत. त्यांमुळे प्रेम आणि वात्सल्याची अभिव्यक्ति तसेच आनंदोत्सव साजरे करण्याची संधी प्राप्त होते. गर्भाधान, पुंसवन आणि सीमातोन्नयन यांसारख्या संस्कारांना पौराणिक आणि प्रतीकात्मक महत्त्व आहे. धर्मशास्त्रानुसार विवाह हा एक संस्कार असून त्याद्वारे दोन भिन्न व्यक्तिमत्वांचे मीलन होते. त्या मीलनातून वंशवृद्धी साध्य करून आत्मसंयम, आत्मत्याग आणि परस्पर साहचर्यामधून दोघांचा आत्मोद्धार करणे हा विवाह संस्काराचा मूळ हेतू असतो.

संस्कार व ते साजरे करावयाचा क्रम ह्याबद्दल वेद आणि गृह्यसूत्रांमध्ये नियम घालून दिलेले आहेत. तथापि विविध स्मृतिकारांमध्ये संस्काराच्या संख्येबद्दल एकवाक्यता नाही. सोळा संस्कार मात्र अनिवार्य मानलेले आहेत. कालक्रमानुसार बरेच संस्कार अस्तंगत झाले असून स्मृतिग्रंथांनी विहित केलेल्या पद्धत्यानुसार संस्कार ब्राह्मणवर्गीय देखील करीत नाहीत. खाली नमूद केलेले विधी व संस्कार साजरे करण्याची महाराष्ट्रात पूर्वीपासून परंपरा होती.

  • ऋतु-संगमन (प्रथम ऋतुप्राप्तीची शुद्धी)
  • गर्भाधान (पुंबीज-रोपण विधी)
  • पुंसवन (पुत्रप्राप्तीस्तव गर्भारपणात केलेला विधी)
  • सीमांतोन्नयन (गर्भारपणात केलेला विधी)
  • जातकर्म ( नवजात अर्भाकाचे कानात शुभ मंत्रोच्चार)
  • पाचवी आणि सटवाई (अर्भकाचे रक्षण व त्याच्या ललाटाची रेषा शुभ व्हावी म्हणून केलेली पूजा)
  • नामकरण (बारसे)
  • कर्णवेध (कान टोचणे)
  • अन्नप्राशन (मुलाचे प्रथम भोजन, उष्टावण)
  • चौल, चुडाकर्म, जावळ (प्रथम केशकर्तन)
  • विद्यारंभ (अध्ययनाचा प्रारंभ)
  • उपनयन, मुंज (व्रतबंध)
  • समावर्तन, सोडमुंज
  • विवाह
  • चतुर्थीकर्म
  • अंत्येष्टी

उपरोक्त संस्कारांपैकी गर्भाधान विधी मुलींच्या लग्नाचे वय वाढल्यामुळे कालांतराने निरर्थक झाल्यामुळे कालबाह्य झाला आहे. नामकरण आणि चौल मात्र वेदमंत्राविना स्नेहसंमेलनाच्या स्वरूपात साजरे केले जातात. बरेच वेळा दोन अथवा अधिक संस्कार एकत्रच साजरे करतात. उदाहरणार्थ, चौल उपनयनप्रसंगी करतात, तर सोडमुंज उपनयनानंतर त्याच दिवशी उरकून घेतात.

प्रत्येक शुभ संस्काराचा प्रारंभ गणपतिपूजन, पुण्याहवाचन मातृकापूजन आणि नांदिश्राद्ध ह्या विधींनी केला जातो. गणपतिपूजन म्हणजे मूठभर तांदळाच्या ढिगावर एक सुपारी गणपतीचे प्रतीक म्हणून ठेवून आपल्या आगमनाने संकल्पित संस्काराची सिद्धी शुभदायक व निर्विघ्न करण्यास्तव केलेले आवाहन होय. संस्कार करणारी व्यक्ती हात जोडून गणपतीला नमस्कार करून `ओम महागणपतये नमो नमः । निर्विघ्नम कुरू ॥' असा मंत्रोच्चार करते.

पुंसवन

हा विधी केल्याने पुत्रप्राप्ती होते अशी श्रद्धा असल्याकारणाने त्यास पुंसवन असे म्हणतात. हा विधी बाईच्या गरोदरपणात तिसऱ्या महिन्यात करतात; कारण त्यामुळे गर्भ-लिंग ठरविणाऱ्या देवता प्रसन्न होऊन पुत्रप्राप्तीचा योग संभवतो.

पाचवी आणि सटवाई

हा जरी वैदिक संस्कार नसला तरी सर्व हिंदू लोक शिशू जन्मल्यानंतर पाचव्या व सहाव्या दिवशी पाचवी व सटवाईची पूजा करतात. बालकच्या जीवनातील हा पहिलाच लौकिक विधी असतो. जन्मानंतर पाचवी व सहावी या रात्री अर्भकास धोकादायक असतात व तेव्हाच त्याच्या ललाटीची रेखा आखली जाते असा सर्वसाधारण समज आहे. म्हणून इडापिडा आणि भूतबाधा टाळण्यास्तव देवतांना प्रसन्न करतात.

नामकरण

बारसे या नावाने महाराष्ट्रात प्रचलित असलेला हा संस्कार सामान्यत: जन्मानंतर बाराव्या दिवशी साजरा करतात. पण स्मृतिग्रंथांनी विहित केलेला वैदिक विधी मात्र केला जात नाही. जन्मसमयीची ग्रहदशा व ज्योतिषशास्त्रीय परिस्थिती लक्षात घेऊन शुभ नाम शोधण्यासाठी ब्राह्मण पुरोहिताचा सल्ला घेतात. ह्या समारंभास प्रामुख्याने महिलांना आमंत्रण देतात. सर्व महिला बालकासाठी भेटवस्तू आणतात. ग्रॅनाईट दगडाच्या वरवंट्याला तेल लावून पाळण्यात ठेवतात. आपल्या अर्भाकास हातात घेऊन आई पाळण्याच्या एका बाजूला उभी राहाते आणि समोरच्या बाजूच्या महिलेस " कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या " असे म्हणते. समोरची महिला वरवंटा हातात घेते आणि मुलाला प्रथमच पाळण्यात घातले जाते. आई मुलाला द्यावयाचे शुभ नांव प्रथम त्याच्या कानात कुजबुजते आणी नंतर आमंत्रितांसमोर घोषित करते. सर्व महिला मग बालक झोपी जाण्यास्तव `पाळणा' गीत म्हणतात. अभ्यागतांना अल्पोहार व घुगऱ्या दिल्यावर नामकरण विधी समाप्त होतो.

कर्णवेध

हिंदू रुढीनुसार प्रत्येक बालकाचे कान टोचणे अनिवार्य आहे. सामान्यपणे सोनाराकडून कानटोचून घेतात. सोनार एक टोकदार सोन्याची तार कानाच्या पाळ्यात खुपसून वलय तयार करतो. मुलीचे कान टोचताना प्रथम डावा कान टोचण्याची प्रथा आहे. `देव-देवतांनो, आमच्या कानातून आम्हास परमोच्च आनंददायक गोष्टी ऐकू येऊ देत' अशा मंत्राने कर्णवेधाचे वेदामध्ये समर्थन केलेले आहे. (ऋग्वेद १.८९.८)

चौल, जावळ

बालकाच्या डोक्यावरील केस जन्मानंतर प्रथमच कापण्याचा हा विधी असतो. हे केस अपवित्र मानल्यामुळे ते विधिवत कापून टाकतात. या विधीमध्ये यज्ञहोम करून कापलेले केस कुणाचाही त्यांवर पाय पडणार नाही अशा तऱ्हेने विसर्जित करतात.

उपनयन, मुंज

महाराष्ट्रात मुंज या नावाने लोकप्रिय असलेला उपनयन हा अत्यंत महत्त्वाचा शुद्धिसंस्कार आहे. तेणेकरून मुलास अध्ययन व ब्रह्मचर्याश्रमाची दीक्षा दिली जाते. प्राचीन झोरोआस्ट्रियन धर्मग्रंथ आणि आधुनिक पारशी लोकांच्या चालीरीती ह्यांच्याशी तुलना केल्यास असे दिसून येते की उपनयन संस्काराचा उगम इंडो-इराणियन संस्कृतीमध्ये झाला असावा. ब्राह्मण आपल्या मुलांची मुंज जन्मानंतर आठव्या वर्षी साजरी करतात, तर क्षत्रिय अकराव्या वर्षी आणि वैश्य बाराव्या वर्षी करतात. तथापि कालावधीबाबत थोडेफार स्वातंत्र्य दिलेले आहे. उपनयनाच्या सुयोग्य मुहूर्ताबद्दल धर्मशास्त्राने गुंतागुंतीचे नियम विहित केलेले आहेत.

धार्मिक विधीच्या प्रारंभी घाणा, गणपतिपूजन, मातृकापूजन आणि पुण्याहवाचन हे उपचार यथास्थित केले जातात. जर चौल ह्यापूर्वीच केलेले नसेल तर उपनयन प्रसंगी उरकून घेतात. वडील आपल्या मुलाचे डोक्यावरील काही केस कापतात. तदनंतर शेंडी व्यतिरिक्त उर्वरित केस न्हाव्याकडून कापून घेतात. बटूस (मुलास) स्नान घातले जाते. मुंज झालेल्या अविवाहित मुलांसोबत आई बटूस आपल्या मांडीवर बसवून भरविते आणि त्याच थाळीमधून स्वतः अन्नग्रहण करते.

मुंजीची मुहूर्तवेला समीप येत असताना बटू आणि त्याचे वडील ह्यांच्या दरम्यान दोन पुरोहित कुंकवाने स्वस्तिकचिन्ह रेखाटलेला अंतरपाट धरतात. पुरोहित मंगलाष्टके म्हणतात आणि आमंत्रित पाहुणे बटू आणि त्याच्या वडिलांवर अक्षता टाकतात. मुहूर्तसमयी पुरोहित मंगलाष्टके समापत करून उत्तरेकडे अंतरपाटा ओढतात. बटू वडिलांना साष्टांग नमस्कार करतो. मंगल वाद्ये वाजू लागतात आणि पानसुपारी देऊन आमंत्रितांचा सत्कार केला जातो.

उपनयन संस्काराचा आता प्रारंभ होतो. होमाग्नी प्रज्वलित करून त्यात तूप, तीळ आणी सात प्रकारच्या समिधा अर्पन करतात. लंगोट आणि पंचा असा पोषाख करून बटू ब्रह्मचर्याश्रमाची दीक्षा देण्यास्तव पुरोहितास हात जोडून विनंती करतो. पुरोहित विनंती मान्य करून त्यास पवित्र यज्ञोपवीत आणि पलाश वृक्षाचा दंडा देऊन ज्ञानार्जनास्तव उपदेश करतो. सूर्याची प्रार्थना केल्यावर बटूदेखील अग्नी समिधा अर्पण करतो. पुरोहित यज्ञाची सांगता करतो, आणि बटूस कानमध्ये गायत्रीमंत्र सांगतो. बटू गायत्रीमंत्राचा पुनरुच्चार करतो.

तदनंतर महत्त्वाचा विधी म्हणजे भिक्षावळ. गणेशमंदिरात जाऊन गणेश स्तोत्रा म्हणतात. कार्यस्थळी परतल्यावार `ओम भवति, भिक्षाम देहि' अशा शब्दात बटू आईचे आर्जव करतो, आई वात्सल्याने ओतःपोत अंतःकरणाने बटूस आशीर्वाद देऊन मिठाई तसेच सोन्या चांदीचे नाणे भिक्षा म्हणून देते. इतर आंमत्रित महिलासुद्धा भिक्षा घालतात. ब्रह्मचाऱ्याने भिक्षा मागूनच उदरनिर्वाह करावा अशी या विधीमागची भावना आहे. उपनयनातील अंतिम विधी मेधाजनन हा होय. मेधा म्हणजे बुद्धी. मेधाजनन विधीमुळे बटूची बुद्धी अध्ययन व वेदाभ्यास करण्यास समर्थ बनते अशी श्रद्धा आहे. म्हणून ज्ञान आणि वैभव यांच्या प्राप्तीस्तव बटू बुद्धिदेवतेची प्रार्थना करतो. पूर्वीच्या काळी हा विधी उपनयनाच्या चौथ्या दिवशी साजरा करीत असत. अलीकडे मात्र मेधाजनन त्याच दिवशी उरकून घेतात.

उपनयनाची सांगता करताना सुपारी आणि कलश या रुपातील अनुक्रमे गणपती आणि वरुण या देवतांना आवाहन करून नमस्कार करतात. आता बटू ब्रह्मचर्यातश्रमात पदार्पण केलेला असतो. त्याने बारा वर्षे अध्ययन करावयाचे असते. अध्ययनांनतर त्याचा समावर्तन म्हणजे सोडमुंज हा विधी करणे अगत्याचे असते. आधुनिक काळात मात्र सोडमुंज उपनयनानंतर लगेच उरकतात. त्यामध्ये बटू दर्भाची मुंज तसेच लंगोटी काढून टाकतो. जरीकाठी धोतर, कोट उपरणे, जरीची टोपी आणि पादत्राणे परिधान करून बनारसच्या यात्रेस जाण्याचे नाटक करतो. तथापि त्याचा मामा त्या मार्गापासून त्यास परावृत्त करतो आणि आपल्या मुलीचा त्याच्याशी विवाह करून देण्याचा संकल्प सोडतो, की जेणेकरून बटूने पुढे योग्य वेळी विवाहबद्ध होऊन गृहस्थाश्रमात प्रवेश करावा.

विवाह

विवाह हा सर्वाधिक महत्त्वाचा संस्कार होय. एका विशिष्ट क्रमाने करावयाच्या अनेक समारंभाचा या संयुक्त विधीमध्ये समावेश होतो. वस्तुतः धर्मशास्त्रानुसार विवाह संस्काराच्या वेळी ४३ विधी साजरे करतात. तथापि सांप्रत काळात बहुतांश विवाह सनातन रुढीतील अनेक उपचार वगळून परिवर्तित पद्धतीनुसार साजरे केले जातात.

महाराष्ट्रातील उच्चवर्णीयांमध्ये सगोत्र, सप्रवर आणि सपिंड विवाह निषिद्ध मानले जातात. तथापि मामेबहिणीबरोबर लग्न करण्यास मुभा आहे. अलीकडे बहिर्विवाहांचे प्रमाण वाढले आहे.

सांप्रतकालीन हिंदू विवाह रूढीचे खालील तीन पद्धतीत वर्गीकरण करता येईल :

(१) वेदमंत्रोच्चाराचा समावेश असलेली आणि गृह्यसूत्रांनी निर्धारित केलेली वैदिक पद्धती

(२) वेदमंत्रविरहित पौराणिक पद्धती आणि

(३) लोणावळ्याच्या धर्मनिर्णय मंडळाने सुचविलेली पुनर्रचित वैदिक पद्धती.

उच्चवर्णीय लोक पहिल्या पद्धतीचा अंगिकार करतात, ब्राह्यणेतर दुसऱ्या पद्धातीचा तर कुठल्याही जातीचे लोक तिसऱ्या पद्धतीनुसार विवाह साजरे करतात.

विवाह रुढी

पारंपारिक विवाह रूढी खूपच विस्तीर्ण होती. अलीकडे मात्र त्यातील बरेच उपचार संक्षिप्त केलेले आहेत, तर काहींची विस्मृती झालेली आहे.

विवाह संस्काराच्या प्रारंभी गणपतिपूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, इत्यादि आराधनात्मक विधी साजरे करतात. महाराष्ट्रातील प्रमुख विवाह विधी क्रमानुसार खाली दिले आहेत.

हळद

विवाह संस्काराचा प्रारंभ मुलास हळद लावण्याने होतो. त्याची आई, बहिण व नात्यातील बायका त्याला सुगंधी तेलात भिजविलेली हळद लावतात. ह्या रंगतदार समारंभात हळदीची गाणी आणि वाजंत्री यांसह मुलास समारंभपूर्वक आंघोळ घालतात. उर्वरित म्हणजे उष्टी हळद, साडी आणि पूजा साहित्यासह, वधूगृही नेतात. वरपक्षाकडे ज्याप्रमाणे हळदीचा कार्यक्रम झालेला असतो त्याचीच वधूकडे पुनरावृत्ती करतात. वधूला हळद लावताना नारळ व पाच मूठभर तांदळांनी तिची समारंभपूर्वक ओटी भरतात. हळद लावल्यावर मुला-मुलीस नवरदेव-नवरी असे संबोधिले जाते.

सीमांतपूजन

वधूगृही जातांना वराने वधूच्या गावाची सीमा ओलांडल्यानंतर सीमांतपूजन करण्याची पूर्वीच्या काळी प्रथा होती. आजकाल विवाहदिनी देवळातच सीमांपूजन करण्याची प्रथा आहे. वधूचे आई-बाप व नातलग वरपक्षांचे स्वागत करण्यास्तव देवळात असलेल्या वराकडे जातात. गणपति आणि वरुण देवतांचे प्रतीक असलेली सुपारी व कलश यांची पूजा करतात. विष्णूस्वरुप नवरदेवास आपली लक्ष्मीसारखी कन्या द्यावयची असल्यामुळे आई-बाप वराची पूजा करतात. आणि त्यास नवीन पोषाख अर्पण करतात. वधूची आई वरमातेचे पाय धुते, आणि वरमाता तसेच वराकडील इतर आप्तेष्ट महिलांचा यथास्थित ओटीभरण विधी करते.

वरप्रस्थान

वरपक्ष वाजतगाजत वधूगृही जातो. मंडपप्रवेशद्वारावर वरास पंचारती ओवाळून सुवासिनी त्याचे स्वागत करतात. नवरदेवास मंडपात समारंभपूर्वक नेऊन चौरंगावर बसतात. शुभ मुहूर्ताची योग्य वेळ कळण्यास्तव पुरोहित घटिकापात्राची योजना करतो.

मंगलाष्टके

लग्न लागण्याचा प्रारंभी नवरदेव पूर्वाभिमुख उभा राहतो. त्याचे समोर स्वस्तिक चिन्ह रेखांकित केलेला अंतरपाट धरतात. वराच्या पुढ्यात अंतरपाटाच्या दुसऱ्या बाजूला नवऱ्या मुलीस उभी करतात. पुरोहित मंगलाष्टके पठन करीत असताना वधू-वरांच्या हातात पुष्पहार असतात. शुभ मुहूर्ताचा क्षण येताच मंगलाष्टक पठन बंद होते. पुरोहित अंतरपाटा उत्तरेकडे ओढून घेतात. वादक वाजंत्री वाजवतात आणि आमंत्रित पाहुणे वधू-वरांवर अक्षता टाकतात. प्रथम वधू वरास वरमाला घालते. नंतर वर वधूस पुष्पहार घालतो; तसेच तिच्या गळ्यात मंगलसूत्र बांधतो. मंगलसूत्रबंधानाने वधू विवाहबंधनात अडकते.

कन्यादान

कन्यादान विधिद्वारे वधूपिता आपल्या कन्येचे पवित्र दान करतो. आपल्या कन्येची धर्म, अर्थ आणि कर्माचे बाबतीत कुठल्याही प्रतारणा करू नये असे वधूपिता वरास आवर्जून सांगतो. `नातिचरामि' या शब्दांनी नवरदेव प्रतिसाद देतो.

लाजाहोम

होमाग्नी प्रज्वलित केल्यावर लाजाहोम विधी होतो. वर मंत्रोच्चार करीत असताना वधू होमाग्नीला भाताच्या लाह्या त्रिवार अर्पण करते. लाह्यांचे चौथे आणि अंतिम अर्ध्यदान वधू नवरदेवाच्या मंत्रोच्चार थांबल्यावर स्तब्धपणे करते. तदनंतर ते जोडपे पवित्र होमाग्नी, भूमाता आणि देवाब्राह्मणांना साक्षी ठेवून अशी शपथ घेते की, आयुष्याच्या अंतापर्यंत सर्व सुखदुःखांमध्ये ते एकमेकाचे साथीदार राहातील. त्यानंतर अग्निपरिणयन आणि अश्मारोहण विधी पार पडतात.

सप्तपदी

सप्तपदीनंतर विवाह संस्कार पक्का आणि अप्रत्यावर्ती होतो. हा विधी करताना यज्ञवेदीच्या सभोवती सात पाटांवर प्रत्येकी एक अशा तांदळाच्या लहान लहान सात राशी मांडलेल्या असतात. प्रत्येक राशीवर सुपारी ठेवलेली असते. होमाग्नी अर्ध्यदानाने प्रज्वलित केला जातो. पुरोहिताच्या सतत मंत्रोच्चार चालू असताना वधूःवर यज्ञवेदीभोवती प्रदक्षणा घालतात. तसे करताना वर वधूचा हात धरून पुढे चालतो. वधू तांदळाच्या प्रत्येक राशीवर प्रथम उजवे पाऊल ठेवते आणि त्याच प्रकारे सर्व राशींवर पाऊल ठेवून चालते. प्रत्येक पदाचा स्वतंत्र मंत्र उच्चारला जातो. त्यानंतर ते दोघे होमाग्नीस तूप आणि लाह्या अर्पण करतात.

सप्तदीनंतर वधू-वर अचल अशा ध्रुवताऱ्याचे दर्शन घेऊन हात जोडून नमस्कार करतात. विवाहसंबधनाचे आजन्म चिरंतन पालन करण्याच्या प्रतिज्ञेचे हे प्रतीक होय.

वरात, गृहप्रवेश, लक्ष्मीपूजन, देवकोत्थापन आणि मंडापोद्‌वासन ह्या विधींनंतर विवाह संस्काराची सांगता होते.

अंत्यंविधी

अंत्येष्टी

देहावसानसुद्धा एक शुद्धिसंस्कार आहे. एकादी व्यक्ती मरणोन्मुख असल्यास तिच्या मुखात लहानसा सोन्याचा तुकडा, तुळशीपत्र आणि गंगोदकाचे काही थेंब टाकतात. उत्तरेकडे डोके ठेवून मृतदेह जमिनीवर ठेवतात. पुरोहिताकडून मंत्रोच्चार चालू असताना मयताचा मुलगा अथवा मुख्य सुतकी व्यक्तीस शुद्धिक्रिया म्हणून आंघोळ करावी लागते. मृतदेहास आंघोळ घालून सुगंधी तेल लावतात आणि नवीन कपड्यात गुंडाळून फुलांनी सजवितात. सुवासिनी मरण पावल्यास तिला हळद व कुंकू लावण्याचा सन्मान प्राप्त होतो. वैदिक व पौराणिक विधी करणारे हिंदू बहुधा मृतदेहाचे दहन करतात, तर इतर लोक देह स्मशानात पुरतात.

उत्तरक्रिया

मरणानंतर सुतक पाळतात आणि बाराव्या अथवा तेराव्या दिवशी उत्तरक्रिया केली जाते. त्याप्रसंगी भोजन आयोजित करतात. भाद्रपद महिन्यातील पितृपक्षात गांभीर्यपूर्वक भरणीश्राद्ध करण्याची प्रथा आहे. सवाष्ण मेलेल्या सुवासिनीच्या नावे तिचा पती हयात असेप्रर्यंत भाद्रपदातील अविधवा नवमीला विशेष अर्ध्यदान करतो. आपल्या मृत पूर्वाजांच्या नावे अक्षय्य तृतीयेला त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दान आणि अर्ध्यदान करण्याची प्रथा रूढ आहे.

अशा प्रकारे आत्मशुद्धी आणि मनाचे उदात्तीकरन करण्यास्तव माणसाचे संपूर्ण आयुष्य विविध शुद्धिसंस्कारांनी संपन्न केले जाते.


पाषाणगुहातील देवळे

कार्ल खंडाळावाला

महाराष्ट्र(Maharashtra State,India)

महाराष्ट्रातील पाषाणगुहातील देवळे आणि भिक्षुनिवास हे भारतीय वास्तुशास्त्र आणि शिल्पकला यांचे काही सर्वोत्कृष्ट नमुने आहेत. इतक्या मोठ्या संख्येने ते भारताच्या अन्य कोणत्याही भागात आढळत नाहीत. लहान-मोठी, पुरी-अपुरी अशी पाषाणातून कोरलेली हजाराहून अधिक स्थाने महाराष्ट्रात आहेत. ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकापासून तो ख्रिस्तोत्तर नवव्या शतकापर्यन्तच्या काळात खोदलेल्या या बौद्ध ,ब्राह्मणी आणि जैन देवळांतून अनेक उत्कृष्ट शिल्पे क्वचित चित्रेसुद्धा आढळतात. अजिंठ्याची जगप्रसिद्ध भित्तिचित्रे ख्रिस्तोत्तर पाचव्या शतकाच्या अखेरच्या दशकांमध्ये आणि सहाव्या शतकाच्या प्रथमार्धात रंगवेली आहेत.

प्राचीन परंपरा

बिहार राज्यातील, गयेजवळच्या बारावर टेकड्यात भारतातील अगदी आरंभीच्या काळातील पाषाणगुहा निवास आहेत. या टेकड्या सम्राट अशोकाने आजीविक साधक आंना देणगी म्हणून दिल्या होत्या. गुहांतील भिंतीचा पृष्ठभाग घासून आरशासारखा गुळगुळीत-चकचकीत केलेला आहे. मौर्य वास्तुकला आणि शिल्पकला यांचे हे अनन्यसाधारण वैशिष्ट्य आहे. त्याचे मूळ नाते इ, स, ३३० मधील पर्शियन साम्राज्याच्या विघटनानंतरच्या आणि कुशल पर्शियन आणि पर्शियन-ग्रीक कारागीर इतस्ततः विखुरल्यानंतरच्या काळातल्या अकामिनिड कलेशी आहे. आश्चर्याची गोष्ट अशी की महाराष्ट्रातील पाषाणगुहांच्या भिंतीच्या पृष्ठभागात जे मौर्य काळानंतर त्याचा लोप झालेला दिसतो.
वास्तुकलानिष्ठ आराखड्याचे अविभाज्य अंग झालेल्या शिल्पकलाकृतीचे मौर्य काळातील एकमेव उदाहरण बाराबर टेकड्यातील लोमश ऋषि-गुंफेच्या प्रवशेद्वाराच्या शिरोभागी आढळते. येथे एक स्तूप असून त्याच्या उभय बाजूंना चैत्याला प्रणाम करणारे हत्ती आहेत. हे खास बौद्ध प्रतीक असे सुचवते की चकचकीत पृष्ठभाग असलेल्या भिंतीची ही लोमश ऋषींची गुंफादेखील सम्राट अशोकानेच बौद्धधर्मियांना दिलेली देणगी असावी. महाराष्ट्रात शतकानुशतके पाषाणगुहातून खोदल्या गेलेल्या चैत्यांची आणि विहारांची निर्मिती अणि तांचा विकास केवळ कोकणातच नव्हे तर दख्खनच्या पठारासुद्धा त्यांचा झालेला विस्तार, यांना अनेक गोष्टी कारणीभूत आहेत.
ख्रिस्तपूर्व सहावे शतक हा असा काळ होता की ज्यावेळी गौतम बुद्ध, महावीर, मख्खलीपुत्त गोशाल यांच्यासरखे श्रेष्ठ चिंतक अस्तित्वाचे गूढ, आपापल्या परीने स्वतंत्रपणे उकलण्याचा प्रयत्न करत होते. महावीराने मुक्तीचा मार्ग तपाचरणाएन शोधला; बुद्धाला तो सदाचाराने सापडला; आणि आजीविक उद्‌गारला "खरोखर आपल्याला कितीसे ज्ञान होऊ शकते?" वैदिक ऋचा आणि उपनिषदातील तत्वप्रतिपादन हाच भारतीय धर्मश्रद्धेचा गाभा राहिला असला तरीसुद्धा येथे बुद्धमताचा प्रसार झाला. त्याचे एक कारण त्यातील सोपेपणा, आणि दुसरे म्हणजे भटा-पुजाऱ्यांची मध्यस्थी आणि यज्ञयाग यांच्याच द्वारा ईश्वरभक्ती करण्याची सक्ती बौद्धधर्माने मोडून काढली. आपल्या शिकवणुकीच्या प्रसारासाठी बुद्धाने संघ निर्माण केले. संघ म्हणजे भिक्षूंची बिरादरी. संघ स्थाप्नेचे उद्दिष्ट, धर्मप्रसारापेक्षाही मानवमात्राला शांती प्राप्त करून देणे आणि सदाचाराचा उदात्त मार्ग दाखवणे, हे होते. बुद्धमताचा प्रसार करत भिक्षूंचे तांडे जरी जवळजवळ वर्षभर सर्वदूर संचार करत असेल तरी पावसाळ्याच्या काळात त्यांच्या हालचाली साहजिकच थंडावत असत. या काळात बुद्धभिक्षू देशाच्या विविध भागातल्या विश्रामिकां मध्ये मुक्काम करीत असत. या पद्धतीमुळे सामुदायिक चर्चा, ध्यान-धारणा सहज शक्य होई. यातूनच, भिक्षू आणि सामान्य अनुयायी यांना राहाण्यासाठी विहार म्हणजे निवास-कक्ष आणि त्यांच्या सामुदायिक पूजा-प्रार्थनेसाठी विहारा शेजारीच चैत्य बांधायची कल्पना निघाली.
ख्रिस्तपूर्व ४८३ साली बुद्ध निर्वाण पावले. त्यानंत्रच्या दोन-अडिचशे वर्षात बौद्ध धर्माने काही प्रगती केली असली तरी त्याचा देशव्यापी प्रसार शक्य झाला तो त्याला सम्राट अशोकाने दिलेल्या आश्रयामुळे. असे म्हणतात की सम्राट अशोकाच्या पुरस्काराने, मौर्याची राजधानी पाटलीपुत्र इथे तिस्स मोग्गलीपुत्त यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या तिसऱ्या बौद्धधर्म-परिषदेत अपरान्त (उत्तरकोकण) आणि दख्खन भागासह देशाच्या विविध विभागात प्रचारक पाठवावे असे ठरविण्यात आले. त्याप्रमाणे बुद्धमतप्रचारासाठी अपरान्तात धर्मरक्षित आणि दख्खन भागात महाधर्मरक्षित या यवन (परदेशीय) भिक्षूंना पाठवण्यात आले. महाराष्ट्रातील बौद्धधर्माची सुरुवात ही अशी झाली.
ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकात उत्तर भारतात शुंग राजांची तर दख्खन आणि कोकण प्रांतात आंध्रांची राजवट होती. याच काळात, पावसाळ्यासाठीच्या पाषाणगुहा निवासांतून आणि सामुदायिक पूजाप्रार्थनेसाठी मठांतून विश्रामिका उपलब्ध करून देण्याची कल्पना निघाली. सह्याद्री पर्वतराजीतील कमी उंचीच्या डोंगर-टेकड्यांमधला काळवथरी प्रस्तर यासाठी अत्यंत सोयिस्कर होता. महाराष्ट्रातील आरंभीच्या बुद्धभिक्षूंना डोंगरात गुहा खोदून काढण्याचे तंत्र माहित असले पाहिजे. कारण बाराबर गुहांमधले अशा खोदाईचे उत्तम नमुने त्यांच्या समोर होते. शिवाय असे की मौर्य आणि पुढच्या शुंग काळापर्यन्त पाषाणात शिल्पाकृती कोरण्याची कला प्रचलित झाली होती. ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शत्तकातच भारहूत आणि सांची येथील शिल्पाकृतींनी सुशोभित प्रवेशद्वारे अणि कठडे असएलेले बौद्धस्तूप बांधण्यात आले होते. सुरुवातीच्या काळात, पाषाणातील वास्तू-शिल्पकलेसाठी लाकूड कोरण्याचे तंत्रच उपयोजनात आले. कारण तोपर्यन्त पाषाणात कोरीव काम करण्याचे कसब भारतीय कारागीरांच्या अंगवळणी पडले नव्हते.
पश्चिम भारतातील गुंफा
भाजे
पाषाणगुहा-निवासाचा सर्वात अगोदरचा नमुना भाजे इथे पाहायला मिळतो. ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकात निर्माण झालेल्या या लेण्यात वास्तू आणि शिल्पकलेतील संकल्पनांचा संयोग झालेला दिसतो. या निवासस्थानी एक चैत्य आणि एक विहार आहे. त्याच्या खोदकामावर उत्तर भारतातून आलेल्या भिक्षूंची देखरेख होती. लाकडी घुमटाकार चैत्य, त्याचप्रमाणे पाषाणातून कोरलेले प्रतिमांकित आणि कथाशिल्पाकृतीमंडित स्तूप, कठडे आणि प्रवेशद्वारे निर्माण करण्याचा अनुभव या भिक्षूंकडे असणारच. भाज्याची लेणी भारहूतच्या लेण्यांनंतरच्या काळातील आहेत हे उघड आहे. पाषाणगुंफातर्गत विश्रामिका बांधण्यासाठी पश्चिम भारतात पाठवण्यात आलेल्या बुद्धभिक्षूंबरोबर उत्तर भारतातील नवकर्मिक नावाच्या भिक्षू-वास्तूशिल्पीपैकी एक कारागीर पाठवला गेला असला पाहिजे यात शंका नाही. पाषाणाची प्रत्यक्ष खोदाई करणे, खांबांना आकार देणे, अर्धवर्तुळाकार घुमटासारख्या चैत्याचे छत बांधणे, ही कामे बव्हंशी स्थानिक कारागीरांनी केली असली पाहिजेत; कारण फार मोठ्या संख्येने पाथरवट उत्तरेतून दक्षिणेत आणणे जमण्यासारखे नव्हते. लाकडी कोरीव कामातील संकल्पनाच वास्तूशिल्पींनी दगडी कोरीव कामासाठी वापरल्या असल्या पाहिजेत हे उतरत्या पाषाणस्तंभावरून स्पष्ट होते. हे पाषाणस्तंभ लाकडी छतांना आधार देणाऱ्या लाकडी खांबांच्याच जणू प्रतिकृती आहेत. लाकडी छताचे वजन आणि प्रसरण पेलण्यासाठीच उतरत्या लाकडी खांबाची योजना असते. ही तांत्रिक बाब जरी केवळ लाकडी वास्तुकलेशीच निगडित असली तरी दगडी वास्तुकलेत तिचे अनुकरण केले गेले. कारण त्या वास्तूशिल्पींना नवे माध्यम अपरिचित होते. पाषाणाशिल्पामध्ये प्रसरण आणि आकुंचन या गोष्टींचा प्रश्नच उद्‌भवत नाही, याची जाणीव त्यांना झाली नाही. परिणामी, दगडी खांबाचा उतार ही वास्तूच्या काळाची निदर्शक अशी खूण बनली. स्तंभ जितका अधिक उतरता तितका त्याचा काळ पूर्वीचा. अखेर पुढे उतरत्या आकाराच्या खांबांची पद्धत लोप पावली. याचे प्रत्यंतर ख्रिस्तोत्तर पहिल्या शतकातील कार्ले येथील विशाल देऊळ-गुंफेत पाहायला मिळते. पाषाणात खोदलेल्या घुमटावर चैत्याच्या बांधणीला उतार असलेल्या खांबाची आवश्यकता नाही याचे भान त्या भिक्षू-वास्तूशिल्पीला आले असावे असे दिसत. सुरुवातीच्या काळात नवकर्मिकांनी आपल्या बरोबर काही पाथरवट आणले असावेत. आणि त्यांच्या सान्निध्यात आतापर्यन्त ज्यांनी लाकडातच कोरीव काम केले होते अशा कारागीरानी सह्याद्री-पर्वतराजीच्या काळवथरी प्रस्तरात पाषाण्गुहा, खांब आणि अर्धगोलाकार छते तक्तपोशी कोरण्याचे हुन्नर शिकवून घेतले असावे उत्तरेतून पाथरवट आणण्याची गरज यथाकाल संपूर्ण नाहीशी झाली तरी उत्तरेकडील भिक्षूसंघातून बहुधा नवकर्मिक येतच राहिले असावे आणि पश्चिम भारतातील कोकण आणि दख्खन या दोन्ही भागातील विहार आणि चैत्य यांच्या उभारणीवर त्यांची देखरेख चालू राहिली असावी.
अशोकाच्या काळात बौद्ध संघातील मतभेदांमुळे भिक्षूंच्या वेगवेगळ्या श्रेणी वा वर्ग निर्माण झाले. कधी कधी हे मतभेद इतके तीव्र असत की उदाहरणार्थ महासांघिकांनी खोदलेल्या गुहानिवासात थेरवादी भिक्षूंना प्रवेश मिळण्याची कल्पना आपण करू शकत नाही. कारण थेरवादी भीक्षू महासांघिकांना पाखंडी मानत असत. सुरुवातीच्या गुहानिवासांतून हीनयान पंथाची उपासना प्रचलित असावी. कारण अशा गुहांतून बुद्धाच्या मानवदेहधारी प्रतिमा आढळत नाहित. बुद्धाच्या पादुका किंव त्याला ज्या वृक्षाखाली आत्मज्ञान झाले तो बोधिवृक्ष, अशा प्रतीकांची पूजा या गुहांमध्ये केली जाई. भाज्याची लेणी खोदणारे पाषणाशिल्पी देखरेख करणाऱ्या नवकर्मिकांबरोबर आलेले उत्तर भारतातीलकारागीर असावेत, कारण भाजे लेण्यात पश्चिम भारतातील सर्वात प्राचीन अशी जी थोडी शिल्पे आहेत त्यांची शैली "भारहूत" आणि सांची स्तूप क्रमांक दोनमधील शुंग-कलेशी स्पष्ट मिळतीजुळती आहे. लाकडातील कोरीव कामाच्या प्रभावाखाली झालेल्या काहीशा सपट शरीराकृतींवरून आणि सपाट आणि गोलाकार चेहेऱ्यांवरून हे लक्षात येते. त्याचप्रमाणे फेट्यासकट त्यांची शिरस्त्राणे, शुंग शिल्पाकृतीतील आणि मृतिका शिल्पांतील शिरस्त्राणांसारखी दिसतात. ही गोष्ट, आंध्र प्रदेशातील कृष्णा खोऱ्यातील स्तूपातून आढळणाऱ्या अगदी आरंभीच्या काळातील संख्येने कमी असलेल्या शिल्पाकृतीतूनसुद्धा पाहायला मिळते.
भाजे लेण्यात दोन लक्षणीय शिल्पे आहेत. एकान्त, ऐरावत हत्तीवर आरूढ झालेला इंद्र आहे. दुसऱ्यात अक्राळविक्राळ राक्षसांची शरिरे चिरडत जाणाऱ्या रथावर आपल्या सेवकांसह बसलेला सूर्य आहे. एक विहाराच्या ओसरीवरच्या एका बाजूच्या भिंतीवर ही शिल्पे आहेत. गुंफेच्या तोंडाशी दोन्ही बाजूंना, शुंग शिल्पांच्या पद्धतीचे कमी उठावदार द्वारपाल आहेत. सुरुवातीच्या काळात, दगडात कोरण्याचे कसब स्थानिक कारागीर उत्तरेकडच्या शिल्पींकडून शिकले हे निश्चित, पण पश्चिम भारतातील इतर पाषाणगुंफातील शिल्पे हे कसब चांगले हस्तगत केलेल्या स्थानिक कारागीरांचीच आहेत असे वाटते. मूळच्या स्थानिक कारागीरांमध्ये कदाचित काही कसबी यवन कारागीरही असू शकतील दगडात कोरीव काम करणाऱ्या कारागीरांना उत्तरेतून आणण्याची पद्धत भाजे गुंफांनंतरसुद्धा चालूच राहिली असावी असे दिसते उदाहरणार्थ, कार्ल्याच्या विशाल चैत्यात कोरलेल्या मिथुन युग्मातील देखण्या, पुष्टा आणि भरदार अंग्रप्रत्यंगांच्या स्त्रिया, मथुरेच्या छत्रपात-पूर्वकुशान काळातील शिल्पाकृतींच्या घाटणीच्या आहेत हे स्पष्टपणे जाणवते.
भाजे येथील चैत्य अत्यंत साधा आहे. त्याच्या स्तंभाच्या तळाशी नक्षी कोरलेली नाही. तसेच त्याच्या वरच्या टोकांवर शिल्पे कोरलेली नाहीत. मात्र चैत्याचा गाभाऱ्यात स्तूप ही पूजनीय वस्तू कोरलेली आहे. घुमटाकार छताला. फाकत जाणाऱ्या लाकडी फासळ्या वा दांड्या आहेत. त्या आजतागायत टिकून राहिल्या आहेत. त्याच्या उभारणीत एखाद्या काष्ठशिल्पीचा हात असला पाहिजे हे उघड दिसते. पंथातल्या निर्वाण पावलेल्या मान्यवर भिक्षूंच्या स्मरणार्थ घडवलेले अनेक छोटे स्तूप कोरलेली एक पाषाण-गुंफाही भाजे येथे आहे.
अजिंठा क्र.१०
कमीअधिक याच धर्तीचा साधा चैत्य दख्खन भागात अजिंठा इथे आढळतो. तेथील भित्तीचित्रे थोड्या नंतरच्या काळातील म्हणजे दुसऱ्या शतकातील आहेत; आणि खांबावरील चित्रे पाचव्या शतकातील आहेत.
कोंडाणे
अजिंठ्यानंतर, पश्चिम घाट भागात अनेक पाषाण गुहानिवास आणि चैत्य बांधण्यात आले. यातील विशेष महत्त्वाची स्थाने म्हणजेच कोंडाणे, भेडसे, नाशिक, जुन्नर आणि पितळखोरे, या मालिकेतील सर्वोत्कृष्ट शिल्प म्हणजे कार्ले येथील विशाल देऊळ-गुंफा. तिचा काळ जवळजवळ निश्चित करता येतो. ख्रिस्तोत्तर चाळीस ते शंभर या साठ वर्षात त्या देऊळ-गुंफेची उभारणी झाली असावी. तसा कार्ले चैत्याचा काळसुद्धा वेगवेगळा मानण्यात आला असला तरी शिलालेखी पुरावा आणि ख्रिस्तोत्तर एकाहत्तर सालापूर्वी कधी तरी संकलित केलेली द पेरिप्लस ऑफ दी एरिथ्रियनसी ही एका अज्ञात दर्यावर्दीची प्रख्यात नोंदवही यासारखी ऐतिहासिक सामग्री वर निर्देशिलेल्या काल निश्चितीला पुष्टी देतात.
कोंडाणे-शिल्पाचे वैशिष्ट्य असे की तेथील स्पष्टपणा आता बराचसा गमावून बसलेल्या शिलालेखात, चैत्य गुंफेच्या बाजूला यक्ष कोरणारा कान्हाशिष्य बलक या कलावंताचा स्पष्ट उल्लेख आहे. शिल्पी म्हणून कान्हा याचा उल्लेख, आता दिल्लीच्या राष्ट्रीय वस्तूसंग्रहालयात असलेल्या पितळखोरे यक्षावरच्या शिलालेखातही आहे. स्वतः निर्माण केलेल्या शिल्पाकृतीवर स्वतःचा नामोल्लेख कोरून ठेवण्याचा हा प्रकार अत्यंत दुर्मिळ आहे. कोंडाणे-यक्ष कोरणाऱ्या बलकाचा गुरु कान्हा आणि पितळखोरे यक्ष कोरणारा कान्हा ही एकच व्यक्ती असेल तर त्या आधारे असे अनुमानिता येईल की एकाच शिल्पीसंघातले किंवा घरण्यातले कलाकार दूरदूरवर पसरलेल्या क्षेत्रात कार्यरत होते.
भेडसे
पशू आणि त्यांच्यावरील स्वार यांनी मंडित झालेल्या मोठमोठ्या स्तंभशीर्षासाठी भेडसे गुंफांना महत्त्व आहे. या खांबामध्ये घोडे निश्चित यवन शिल्पीच्या हातचे आहेत. कारण घोड्यांचे ते ठाणमाण भारतीय शिल्पकारांच्या धाटणीचे नाही; मात्र ते आशियाई-ग्रीक शिल्पकाराला स्वाभाविक वाटणासारखे आहे. यवन या शब्दाची अर्थकक्षा व्यापक आहे. सर्वसामान्यपणे यवन म्हणजे विदेशी. मग तो पर्शियन, सिथियन, आशियानी ग्रीक, पार्थियन, कोणीही असू शकतो. अलेक्झांड्रियासारख्या बाजारपेठेसकट पश्चिम आशियातील अनेक भागांतून विविध मालाची मोठी लाभदायक ने-आण करणाऱ्या यवन व्यापाऱ्यांच्या वसाहती भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर काही ठिकाणी स्थापन झाल्या असल्या पाहिजेत. रोम आणि इतर पश्चिम आशियाई नगरात पाठवले जाणारे भारतीय मसाले आणि मोती यांची विक्री हे व्यापारी करीत. कारण पश्चिम भारतातील पाषाण-गुहा निवासांना ते भेट देत असत. कार्ले गुंफांनाच त्यांच्याकडून वेगवेगळ्या सात देणग्या मिळाल्या होत्या. वाङमयीन आणि इतर साधनांवरून आपल्याला समजते की मजबूत बांध्याच्या, बहुधा सिथियन, यवनांची नगर वा राजसम्राटरक्षक म्हणून किंवा त्यांच्या अश्वारोहण कौशल्यामुळे घोडदळ सैनिक किंवा सईस म्हणून नेमणूक करण्यात येत असे. अजिंठ्यापसून जवळच दख्खन भागात असलेल्या, ख्रिस्तपूर्व पहिल्या शतकातील पितळखोरे येथील आरंभीच्या पाषाणगुहानिवासाचे खास वैशिष्ट्य म्हणजे तेथील शिल्पित केलेले यवन द्वारपाल. त्यांची चेहेरेपट्टी, अंगलट, पोशाख यांच्यावरून ते विदेशी आहेत यात शंका राहत नाही. या शिल्पावरून जी आणखी एक गोष्ट लक्षात येते ती ही की पश्चिम भारतातील बुद्धभिक्षूवर्गाचे यवन व्यापारी वर्गाशी आणि भारतीय व्यापारी नगरातून चाकरी करणाऱ्य यवनांशी सलोख्याचे संबंध असले पाहिजेत.
व्यापारी मार्ग
हे सगळे बौद्ध पाषणगुहानिवास डोंगराळ भागात असले तरी अशा ठिकाणी होते की नाणेघाट, थळघाट, भोरघाट हे डोंगरी व्यापारी मार्ग त्यांच्या जवळून जात, पश्चिम किनाऱ्यावर भरभराटीला आलेल्या कल्याण आणि सोपारा बंदरात येणारा परदेशी माल बैलगाड्यांतून याच डोंगरी मार्गानी अंतर्भागात पोचवला जाई. मोक्याच्या ठिकाणी वसलेल्या या पाषाणगुह्यनिवासातील बौद्धभिक्षूंना जवळच्या व्यापारी मार्गानी रहदारी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून विविध जीवनोपयोगी वस्तू सहज उपलब्ध होत असत. भिक्षूंची राहणी तशी अत्यंत साधी होती. बुद्धाच्या आदेशाप्रमाणे भिक्षा मागून आणलेल्या अन्नावरच बव्हंशी त्यांची गुजराण चाले. तरी सुद्धा पावसाळ्याच्या दिवसात भिक्षा मागणे शक्य होत नसे.
या परिस्थितीमुळे अन्नधान्य आणि तेल, औषधे यासारख्या काही महत्त्वाच्या वस्तू यांची थोडीफार बेगमी करणे आवश्यक असे. त्याशिवाय कार्ल्यासारखा काही पाषाणगुंफानिवासांना अनेक गावे मिळून शिधा पुरवठा करत असत; गावात पीक भरमाप आले तर जादा धान्याच्या बदल्यात व्यापाऱ्यांडून जीवनावश्यक वस्तू किंवा प्रसंगी पैसेसुद्धा घेतले जात असावेत.
काही काळ लोटाल्यावर या पाषाणगुंफा, अल्पकालीन विश्रामिका म्हणून नव्हे तर वर्षभरासाठी कायमची निवासस्थाने म्हणून वापरल्या जाऊ लागला. नजिकच्या परिसरातील सामान्या भक्तजन या मठांना भेट द्यावे. व्यापारासाठी मुशाफिरी करणारे अनेक व्यापारी प्रसंगी मठांत मुक्काम करायचे आणि मठाला देणग्या द्यायचे. काही बुद्धभिक्षू या गुंफातून कायम वास्तव्य करत असले पाहिजेत. या मठातून पाण्याची अनेक टाकी आढळतात. त्यावरून नियमित आणि पुरेसे पाणी (निवासींना) उपलब्ध व्हावे अशी काळजी घेतली जात होती असे दिसते. विहारातील अनेक ओवऱ्यातून पाषाणातच कोरुन/खोदून काढलेल्या शय्या वा मंच आढळतात. वरिष्ठ श्रेणीतील भिक्षूंसाठी आणि रुग्णाईतांसाठी बहुधा ही व्यवस्था असावी. कान्हेरी गुंफात एक जेवणघर सुद्धा आहे. त्याचा उपयोग प्रवचनस्थळ म्हणूनसुद्धा केला जात असावा.
कार्ले
कार्ले येथील मिथुनयुग्मे आणि स्तंभशीर्षावरील हत्ती व घोडे यावरील स्वारांची शिल्पे दोन्ही उच्च दर्जाची आहेत. कोकणातील आरंभीचा चैत्यातून सुरू झालेल्या या शिल्प परंपरेचे जतन ख्रिस्तोत्तर दुसऱ्या शतकातील उत्तरर्धापासून पुढे सुमारे तीनशे वर्षे मुंबईनजिकच्या विस्तृत कान्हेरी भिक्षू-निवासामध्ये केले गेले. त्या शैलीचे सर्वात दिमाखदार दर्शन ख्रिस्तोत्तर पाचव्या शतकाच्या मध्यास निर्मिलेल्या घारापुरी (एलिफंटा) येथील पाषाण गुंफामंदिरातील ब्राह्मणी पाषाणशिल्पात होते. घारापुरी येथील शिल्पकलेला, कोकणनिवासी मौर्य या स्वतंत्र आणि सामर्थ्यशाली राजघराण्याचा आश्रय होता. ख्रिस्तोत्तर ५३३ ते ६२० किंवा त्यानंतर काही काळपर्यन्त मौर्यांची राजवट चालू होती. बदामीचा चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याने अखेर मौर्याची सत्ता बुडविली.
बौद्ध पाषाण वास्तूकलेच्या क्षेत्रात भारतातील कार्ले येथील बुद्ध-गुंफामंदिर सर्वोकृष्ट आहे. आकार आणि सौंदर्य या दोन्ही दृष्टींनी ते अजिंठ्याच्या विशाल चैत्यांपेक्षा आणि वेरूळच्या विश्वकर्मा चैत्यापेक्षा भव्य आहे.
कान्हेरी
मुंबईच्या नजिकच्या कान्हेरी येथील विस्तृत गुंफा वसाहतीतील चैत्य काही प्रमाणात कार्ले चैत्याची प्रतिकृती आहे. शिलालेखातील पुराव्यावरून ही निर्मिती ख्रिस्तोत्तर दुसऱ्या शतकाच्या उत्तरर्धात झाली असे दिसते. कार्ल्याइतकी भव्यता नसली तरी कान्हेरी गुंफा एक खास रमणीय गोष्ट आहे. अणि ती म्हणजे तेथील चैत्याच्या ओसरीमध्ये उभय बाजूंच्या कोनाड्यात असलेल्या मिथुन-युग्मांच्या दोन जोड्या. ही मिथुन युग्मशिल्पे कार्ले येथे आढळणाऱ्या छत्रपालपूर्व कुशान शैलीतील असण्यापेक्षा उत्तर कुशान परंपरेतील अधिक वाटतात. परंतु मुंबईच्या प्रिन्स ऑफ वेल्स पुराण वस्तुसंग्रहालयाचे संचालक श्री सदाशिव गोरक्षकर यांनी सर्वप्रथम निर्देशिल्याप्रमाणे, या मिथुनयुग्म शिल्पात, विशेषतः त्यांच्या चेहरेपट्टीत आणि केशभूषेत काही परकीय, खासकरून पार्थियन धाटणीचा प्रभाव दिसतो. त्यातील सिंहमुखी कर्णभूषणांचे साम्य गांधर्व शिल्पातील कर्णभूषणांशी दिसते. कदाचित उत्तरेकडील कोण्या पाषाणशिल्पीने या मिथुनशिल्पांची निर्मिती केली असेल. कान्हेरी येथे शंभरहून अधिक गुंफा आहेत. श्रीमती शोभना गोखले यांनी सुचविल्याप्रमाणे त्या ठिकाणी भिक्षुंसाठी चैत्यासहवर्तमान, विस्तृत पाषाण गुंफानिवास व्यवस्था आणि बौद्ध धर्मतत्वांच्या अध्यापनासाठी विद्यालयही असावे असे दिसते. अकराव्या शतकाच्या प्रारंभीच्या काळात इरानमधील पारशांनी कान्हेरीला १००९ मध्ये दोनदा व १०२१ मध्ये एकदा अशी तीन वेळा भेट दिली व प्रत्येक वेळी आपली नावे व भेटीच्या तारखा तेथे एकाच गुंफेत पेहेलवी लिपीत कोरून ठेवल्या आहेत. यावरून अकराव्या शतकातही कान्हेरी बौद्धविहार परकीयांना आकर्षित करण्याइतका महशूर असला पाहिजे
कान्हेरीतील मिथुनयुग्म शिल्पात कुशान प्रभाव दिसतो. पण त्याखेरीज पाचव्या शतकात गुप्तशिल्पाच्या सकृद्‌दर्शनी सारनाथी शिल्पाचा प्रभावही आढळतो. त्यावरून असे वाटते की त्या सुमारास सारनाथ पीठाचा एखादा नवकर्मिक अथवा शिल्पकार कान्हेरी येथे कार्यरत असावा.
पाचव्या शतकाच्या अखेरीस कान्हेरी येथील चैत्याच्या ओसरीत कोरण्यात आलेल्या दोन विशाल बुद्धाकृती हा नवा शिल्पप्रयोग मानला पाहिजे. प्रत्येक बुद्धाकृती बावीस फुट उंच आहे. आणि घारापुरी येथील ब्राह्मणी गुंफा-मंदिरातील विशाल शिल्पकृती या कान्हेरीतील बुद्धमूर्तीच्या अनुकरणातून निर्माण झाल्या असाव्या. या संदर्भात, परळ येथील, महाकाय परंतु अपूर्ण शिवमूर्ती, श्रीयुत सदाशिव गोरक्षकर यांनी अलीकडेच शोध लावलेल्या परळ परिसरातील शिवडी येथील काहीशा अपूर्ण अवस्थेतील छोट्या आकाराची शिवमूर्ती आणि मातृकामूर्ती यांची दखल घेतली पाहिजे. याचा अर्थ असा की परळ येथे एखादी शिल्पकलेची कार्यशाळा असली पाहिजे. आणि आता मुंबईच्या प्रिन्स ऑफ वेल्स पुराणवस्तुसंग्रहालयात दाखल असलेल्या व मुळात घारापुरी येथे सापडलेल्या फुटकळ शिल्पाकृती या कार्यशाळा तयार झाल्या असाव्या. घारापुरी गुंफा-मंदिरातील शिल्पे आणि परळ येथील महाकाय शिवमूर्ती यांचे जन्मस्थान परळची कार्यशाळा असले पाहिजे, असे आपण दीर्घकाळ मानत होतोच. श्रीयुत सदाशिव गोरक्षकर यांनी शोधलेल्या परळ परिसरातील शिवडी कार्यशाळेमुळे आपल्या उपनिर्दिष्ट सिद्धान्ताला मोठाच आधार लाभला आहे.

घारापुरी
बौद्ध पाषाणगुहा निवास आणि चैत्य यांच्या ख्रिस्तपूर्व दोनशे वर्षापासूनच्या अखंड परंपरेमुळे पश्चिम भारतातील इतर धर्ममतानुयायांना सुद्धा अशी स्थाने निर्माण करावी अशी प्रेरणा मिळाली असावी: उदाहरणार्थ (१) ख्रिस्तोत्तर सहाव्या शतकाच्या मध्यास घारापुरी येथे पाषाणात खोदलेले भव्य शैव मंदिर, (२) काही काळानंतर खोदलेले मंडपेश्वराचे शैवमंदिर आणि तेथील सुबक नटराजमूर्ती, आणि (३) जोगेश्वरी येथील सहज ओळखता येणारे एक लाकुलिश भितिशिल्प अंतर्भूत असणारी शैव लेणी. खरे म्हणजे ही तीनही शैव-मंदिरे. त्या काळात भारतभर आणि विशेषतः पश्चिम भारतात अस्तिवात असलेल्या पाशुपत उपासना पंथाची आहेत. या तीनही शैव मंदिरांना निष्ठावंत पाशुपतपंथीय असलेल्या कोकण मौर्याचा उदार आश्रय होता. यात संशय नाही या मताला पुढील कोरीव लेखातील भक्कम आधार सापडतो. १) ख्रिस्तोत्तर ४९४ मधील कान्हेरी येथील त्रैकूटक ताम्रपट २) ख्रिस्तोत्तर ५०४ मधील त्रैकूटक राजा मध्येसेनाचे मातवण येथील कोरीव लेख; ३) ख्रिस्तोत्तर ५३३ मधील अपरान्ताधिपती (अपरान्तादी देशपती) असे ज्याचे वर्णन केले जाते त्या त्रैकूटक राजा विक्रमसेनाचे मातवण कोरीव लेख या लेखात त्रैकूटनाम या ऐवजी कलचुरीनाम असा केलेला बदल हा कै. डॉ. वा. वि. मिराशि यांनी निर्णायकपणे दाखवल्याप्रमाणे उघड‍उघड प्रक्षिप्त वाटतो. कारण कोणत्याही मांडलिकाचा उल्लेख महाराजा असा होणार नाही. आणि तो जर कलचुरींचा मांडलिक (महासामंत) असेल तर त्याचे वर्णन अपरान्ताधिपती असे केले जाणार नाही. ४) ख्रिस्तोत्तर ५९७ मधील कलचुरी राजा शंकरगण याच्या आभोणा कोरीव लेखात एक गौरवपर शब्दप्रयोग आढळतो. काही राजांच्या कोरीव लेखात आणि प्रशस्ती लेखात असे गौरवपर उल्लेख सर्रास दिसतात. आभोणा कोरीव लेखातील तो शब्दप्रयोग गर्वाने असे उद्‌घोषित करतो की कलचुरी साम्राज्य पूर्व समुद्रापासून पश्चिम समुद्रापर्यन्त आणि इतरही प्रदेशात विस्तृतपणे पसरले आहे. प्रत्यक्षात ते अस्तित्वात नव्हते. या पूर्णपणे निराधार घोषणेचा आधार घेऊनच उत्तर कोकण मौर्यावरील कलचुरी घराण्याच्या आधिपत्याचा सिद्धान्त मांडण्यात आला आहे. पुढे जाऊन असेही प्रतिपादन केले जाते की कोकण मौर्य राजे हे कलचुरीचे मांडलिक होते. आणि त्यामुळे त्यांच्यापाशी घारापुरीसारखे भव्य मंदिर-शिल्प उभारण्यासाठी लागू शकणारी साधनसामग्री तशीच राजनैतिक पदप्रतिष्ठाही नव्हती. यावरून घारापुरी-शिल्प कलचुरींनीच उभारले असले पाहिजे; किंवा कदाचित ते मौर्यानी उभारले असले तरीसुद्धा त्यासाठी पशूपती शिवाची भक्ती करणाऱ्या कलचुरींचे कोषागार, पुरस्कार आणि कल्पकता यांचे सहाय्य लाभले असले पाहिजे.
घारापुरी मंदिराशिल्प ही कलचुरींची निर्मिती आहे हे मत मुळीच पटण्यासारखे नाही. कारण स्वतः शंकरगण किंवा कृष्णराजा या सारखे त्याचे कोणी पूर्वज अपरान्ताचे म्हणजे उत्तर कोकणाचे कधीतरी अधिपती होते हे गृहीतकृत्यच निराधार आहे. खरे म्हणजे ख्रिस्तोत्तर ४९४ मधील कान्हेरी येथील कोरीव लेख आणि मातवण येथील कोरीव लेख यांच्यावरून असे दिसते की निदान ख्रिस्तोत्तर ५३३ पर्यन्त तरी त्रैकूटकांची सत्ता, वर्चस्व, अमल जारी होता. त्यानंतर,ख्रिस्तोत्तर ६३४ मधील दुसऱ्या पुलकेशीच्या मेगुती कोरीव लेखात अशी माहिती मिळते की दुसऱ्या पुलकेशीचा पिता कीर्तिवर्मा (ख्रिस्तोत्तर ५६६ ते५९८) याचा कोकण मौर्याशी संग्राम झाला. तथापि उत्तर कोकणात त्याला पाय रोवता आला नाही, आणि मौर्यसत्तेचे अधिराज्य त्या प्रदेशात अबाधित राहिले. त्यानंतर दिर्घ काळाने दुसऱ्या पुलकेशीने आपले सर्व सैन्यबळ आणि शेकडो जहाजांचे प्रचंड आरमार यांच्या साहाय्याने उत्तर कोकणच्या मौर्य राजांचा पराभव केला आणि त्यांची पश्चिम समुद्राची भाग्यदेवता अशी ख्याती असलेली पुरी ही राजधानी काबीज केली. पुरी म्हणजेच आजची घारापुरी. त्यामुळे आभोणा कोरीव लेखातील शंकरगणांच्या राजाचा दावा हा अत्युक्तीचाच प्रकार मानला पाहिजे. एखाद्या काल्पनिकचक्रवर्ती राजाला पराभूत करून मिळवलेला काल्पनिक दिग्विजय उल्लेखणारी अशी अत्युक्ती प्रशस्तोपर कोरीव लिखातून सर्रास आढळते. खरे म्हणजे, ख्रिस्तोत्तर ५९७ मध्ये शंकरगणाने उत्तर कोकणावर आपले अधिराज्य स्थापन केले असण्याची शक्यताच नाही. कारण मौर्याचा पराभव करण्यात महाप्रतापी चालुक्य सम्राट कीर्तिवर्मा यालाही यश आलेले नव्हते. आणखी असे की शंकरगणामागून गादीवर आलेला कलचुरी राजा बुद्धसेन याचा, कीर्तिवर्माचा भाऊ मंगलेश्वर याने ख्रिस्तोत्तर ६०२ मध्ये पूर्णपणे मोड केला होता. कलचुरींनी उत्तर कोकणात एक सुद्धा देणगी दिल्याचा उल्लेख कोरीव लेखांमध्ये आढळत नाही. डॉ. स्पिंकचा उत्तर कोकणावरच्या कुलचुरी आधिसत्तेचा प्रसिद्ध सिद्धान्त, निराधार गृहीतकृत्ये आणि कोरीव लेखातील पुराव्याचे चुकीचे विश्लेषण यावरच उभा आहे. ख्रिस्तोत्तर ५३३ नंतरच्या नजीकच्या काळापासून तो मौर्याची राजधानी आणि शासनपीठ अशी पुरी म्हणजे घारापुरी. दुसऱ्या पुलकेशीने काबीज करेपर्यन्त म्हणजे सुमारे ख्रिस्तोत्तर ६२०-६२५ पर्यन्त उत्तर कोकणावर मौर्याचेच सार्वभौमत्व होते. हे कोरीव लेखांतर्गत पुराव्यावरून सिद्ध होते. पुलकेशी राज्यावर आला तो ख्रिस्तोत्तर ६१०-६११ या काळात.
ख्रिस्तोत्तर ५३०ते ५६६ या काळात घारापुरी एलिफंटा येथील भव्य गुंफामंदिर उभारण्यात आले यात संशय असण्याचे कारण नाही. या मंदिराच्या उभारणीमुळे मौर्याची कीर्ती विस्तार पावली यामुळेच कीर्तिवर्माची नजर मौर्याकडे वळली मात्र, मौर्याचे गर्वहरण करण्याचा, त्यांचा प्रदेश बळकवण्याचा कीर्तिवर्माचा प्रयत्न असफल झाला. मेगुती कोरीव लेखात निर्देशिल्पाप्रमाणे कीर्तिवर्माने कादंबांचा निःपात जरूर केला; परंतु लेखातील अत्युक्तीत नळ-मौर्य- आणि कदंब यांची जणू काळरात्रच असा कीर्तीवर्म्याचा उल्लेख केला असला तरी मौर्याचा पराभव तो करू शकला नव्हता. कोरीव लेखात, कदंबाचा निःपात केला एवढेच म्हटले आहे. (त्यातून) मौर्याचे दमन झाले नाही, असा अर्थ काढणे अवघड जाऊ नये. कीर्तिवर्मानेच मौर्याचा निःपात केला असता तर, ख्रिस्तोतर ६२०-६२५ च्या सुमारास आपल्या सामर्थ्याच्या शिखरावर असलेल्या मौर्याचा पराभव आणि पुरीवर आक्रमण करण्यासाठी आपले संपूर्ण सैन्यबळ आणि आरमार वापरण्याचा प्रसंगच मुळी पुलकेशीवर आलाच नसता.
मेगुती कोरीव लेखांत कलचुरींचा निर्देश नाही; आणि कलचुरी राजे कधी काळी मौर्याचे खरोखरच सम्राटा असते तर दुसऱ्या पुलकेशीन सर्वप्रथम गर्विष्ठ पणे उद्‌घोषित केले असते की प्रथम कीर्तिवर्म्याला आणि नंतर आपल्याला आव्हान देण्याची हिंमत मौर्याच्या सम्राटांना झाली नाही. इतकेच नव्हे तर मांडलिक मौर्याच्या चालुकांविरुद्धच्या युद्धात समूळ उच्छेद होत असताना मौर्याधिपती कलचुरी तो प्रकार अगतिकपणे पहात बसले. मौर्यांचे सम्राट असूनही कीर्तिवर्म्याविरुद्ध आक्रमणात मौर्याचे रक्षण करायला कलचुरींनी बोटही उचलू नये. हे खरोखरच विचित्र मानले पाहिजे. कोकण मौर्यांचे सामर्थ्य मोठेच असले पाहिजे. एरवी पुरी (किंवा घारापुरी) सारखी बेटा-राजधानी काबीज करण्यासाठी दुसऱ्या पुलकेशिला, शेकडो जहाजांची गरज भासली नसती. घारापुरी शिल्पे ही कलचुरींची निर्मिती आहे हा मिराशी-स्पिंक सिद्धान्त, ऐतिहासिक साधनसामग्री आणि शक्यता आणि योग्य तऱ्हेने विश्लेषीलेला कोरीव लेखातील पुरावा यांना विरोधी अशा अप्रस्तुत गृहीत कृत्यातून उद्‌भवलेला आहे. खरे म्हणजे या संदर्भात कलचुरींना काहीच स्थान नाही. परंतु डॉ. मिराशींनी प्रथम तसे चुकून मानले. मग, ख्रिस्तोत्तर ५३३ मधल्या दुसऱ्या मातवण कोरीव लेखांच्या अचूक विश्लेषणान्ती त्यांनी आपल्या मतात पुष्कळ सुधारणा केली. डॉ. वॉल्टर स्पिंक यांनि डॉ.मिराशींचे पहिलेच मत विस्ताराने मांडले; आणि अधिकतर निराधार गृहीतकृत्यांच्या आधारे त्यांनी दुसऱ्या मातवण कोरीव लेखांचे चुकीचे विश्लेषण केले. उत्तर कोकणात काही ठिकाणी कलचुरी राजा कृष्णराजा (ख्रिस्तोत्तर५५०-५७५) याची काही नाणी सापडली एवढ्यावरून कलचुरींचे आधिपत्य सिद्ध होण्यासारखे नाही, या गोष्टीकडे पुष्कळ वेळा दुर्लक्ष केले जाते. पुष्कळ वेळा फिरस्ते व्यापारी, यात्रेकरू यांच्यामुळे नाणी स्थलांतर करतात. या स्थलांतरित नाण्यांवरून त्या ठिकाणचे त्या राजाचे स्वामित्व निर्णायकपणे सिद्ध होत नाही. शिवाय असे की सह्याद्री पर्वतराजी पठारांवर नाशिक वा अन्य काही ठिकाणी कलचुरी स्थिरपद झाले होते असे मानले तरी त्यावरून सह्याद्री पर्वतराजी आणि अरबी समुद्र यांच्यामधील उत्तर कोकणावर त्यांची सत्ता होती. असा निष्कर्ष अटळपणे मुळीच निघत नाही. ख्रिस्तोत्तर ५३३ते६२०-६२५ पर्यन्तच्या काळात कोकण मौर्यांच्या स्वाधीन असलेला हा भूप्रदेश, ख्रिस्तोत्तर ६२०-६२५ मध्ये पुलकेशीने पुरी काबीज करीपर्यन्त कोणत्याही राजाने जिंकलेला नव्हता. घारापुरी येथील प्रमुख गुंफेच्या उत्तरेकडच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला असलेली शिल्पाकृती लाकुलिश नसून महायोगी शिवाची आहे. समजा, ती लाकुलीश असती तरी तेवढ्यावरून घारापुरी येथील शिल्पे कलचुरींच्या आश्रयाखाली, त्यांचे तथाकथित मांडलिक असलेल्या कोकण मौर्यांनी खोदली आहेत असा निष्कर्ष काढता येणार नाही. कलचुरी राजे पशुपती शिवाचे मोठे भक्त होते. या कोरीव लेखातील पुराव्यावरून घारापुरीच्या संदर्भात, काहीच निष्कर्ष निष्पन्न होऊ शकत नाही. मौर्य आणि इतरही अनेक घराणी पशुपती शिवाची निःसंशय तितकीच मोठी भक्त होती. त्या काळात पशुपती शिवोपासनेचा पंथ, विशेषतः पश्चिम भारतात, विस्तृतपणे प्रसार पावला होता.
एलिफंटा अजून घारापुरी या नावाने ओळखली जाते. तेथे सापडलेल्या ख्रिस्तोत्तर बाराव्या शतकातील एका ताम्रपत्रावर त्याचा श्रीपुरी असा उल्लेख केलेला आहे. दुसऱ्या पुलकेशीच्या मेगुती कोरीव लेखात निदेशिलेली किकण मौर्याची राजधानी आणि शासनपीठ असलेली पुरी म्हणजेच घारापुरी होय. या बाबत थोडीसुद्धा शंका बाळगायला नको. घारापुरीच्या एका उतारू धक्क्याला आज सुद्धा मोरा(मौर्य) बंदर म्हणतात, ही गोष्ट अत्यंत अर्थपूर्ण आहे.

घारापुरीवर कान्हेरीचा काही प्रभाव स्पष्टच दिसतो. हा प्रभाव कान्हेरीच्या दोन उभ्या भव्य बुद्धमूर्तीचे अनुकरण करणाऱ्या शिल्पाकृतींच्या आकारमानातच दिसतो असे नव्हे तर तो शिवाच्या मूर्तिकारीमध्येही दिसतो. दोन नागांनी उभवलेल्या कमळावर आसनस्थ झालेली महायोगी शिवाची प्रतिमा शैव नव्हे तर बौद्ध मूर्तीकारीतून सिद्ध झाली आहे. अशी प्रतिमा कान्हेरी येथेही आढळते. तेथे नंद आणि उपनंद या नागराजांनी उभवलेल्या सुवर्ण कमळावर बुद्ध श्रावस्तीच्या चमत्कारानंतर आसनस्थ झाले असून ते प्रवचन करत आहेत. शिव-पुराणाच्या शैव मूर्तिकारमध्ये नागांची उपस्थिती असली तरी तेथे शिव कमळावर आसनस्थ बसतो. तेव्हा घारापुरीतील ही गोष्ट उघडच खिरस्तोत्तर पाचव्या शतकाच्या अखेरच्या काळातील कान्हेरी येथील बौद्ध शिल्पकलेकडून उसनी घेतलेली आहे. घारापुरी येथे कलचुरी राजा कृष्णराजा याच्या नावाची शेकडो नाणी सापडली आहेत. खरे म्हणजे ही कृष्णराजाची नेहमीची नाणी नाहीत. हीनाणी घारापुरी येथे पाडण्यात आली असून तेथील तथाकथित कलचुरी प्रणीत गुंफामंदिर खोदणाऱ्या कारागीरांचे वेतन म्हणून देण्यात येई असे सुचवले जाते. यासंदर्भात एवढेच म्हणता येईल की या कल्पनेत काहीही तथ्य नाही. आश्चर्याची गोष्ट अशी की ही सगळी नाणि समुद्रकिनाऱ्यावर सापडली आहेत. काही कारणाने बंदरात आसरा घ्यावा लागलेल्या अथवा यात्रेकरूंच्या जहाजावरून ही नाणी तेथे आली असतील. कारण देशाच्या विविध भागातून घारापुरीला भेट देण्यासाठि मोठ्या संख्येने यात्रेकरू येत असले पाहिजेत. उदाहरणार्थ, छत्रपांची ही काही नाणी घारापुरी येथे सापडली आहेत पण त्यातून काही खास निष्कर्ष काढता येत नाही.
एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती अशी की घारापुरी, जोगेश्वरी, आणी मंडापेश्वर हा वादग्रस्त गुंफासमूह वगळता उत्तर कोकणाबाहेरच्या ज्या क्षेत्रात कलचुरींची सत्ता निर्विवादपणे होती तेथील सर्वमान्य कलचुरी शैलीतील एकही मंदिर उत्तर कोकणात आढळत नाही. उलटपक्षी, वास्तुशास्त्रीय वा शिल्पशास्त्रीय भव्यपणात घारापुरी, किंवा मंडपेश्वर किंवा जोगेश्वरी येथील कलेशी थोडीसुद्धा बरोबरी करू शकेल असे एकही मंदिर या शिल्प कलचुरींच्या आधिपत्यखालील प्रदेशात नाही.
या वस्तुस्थितीवरून असे दिसते की घारापुरी येथील विशाल मंदिर आणि त्याहूनकमी आकारमानाची मंडेपेश्वर आणि जोगेशेश्वरी येथील मंदिरे ही स्थानिक वास्तुशास्त्रज्ञ आणि शिल्पकार यांची निर्मिती असली पाहिजे. आणि विशेष कलादृष्टी असलेल्या उत्तर कोकणच्या मौर्य राजांच्या अत्यंत मतवादी आश्रयाखाली जोपासलेल्या प्रतिभेतून ती साकारली असली पाहिजेत. महाराष्ट्रातील उत्तर कोकणच्या स्थानिक, परंतु सामर्थ्यशाली राजघराण्याला घारापुरीच्या कलावैभवाचे श्रेय द्यायला हवे.
घारापुरीबाबत आणखी एकमत असे आहे की ती वाकाटकांची निर्मिती आहे. हे मत प्रथम मांडले कै. डॉ. शिवराममूर्ती यांनी. घारापुरी येथील शिल्पांचे शैलीच्या दृष्टीने विश्लेषण केले तर असे दिसेल की येथील शिल्पे अजिंठ्यापेक्षा अगदी वेगळ्या ढंगातील आहेत ही एक गोष्टा नीट ध्यानात ठेवली पाहिजे. शिवराममूर्तीच्या चुकीच्या निष्कर्षाला तीच कारणीभूत असली पाहिजे. ती अशी की, ख्रिस्तोत्तर पाचव्या शतकापासून नवव्या शतकापर्यन्तच्या काळातील महाराष्ट्रातील सुरुवतीच्या शिल्पकाला कृतीत, मग त्या घारापुरी, अजिंठा वेरूळ किंवा औरंगाबाद अशा कुठल्याही असोत आणि बौद्ध, ब्राह्मणी किंवा जैन अशा कोणत्याही पंथाच्या असोत. काही समान वैशिष्ट्ये आहेत. परंतु त्यांच्या शैलीचे सखोल विश्लेषण केल्यास असे उघड होते की अजिंठ्याचे वाकाटक शिल्पकार हे घारापुरीचे शिल्पकार निश्चितच नव्हेत. घारापुरीचे शिल्पकार हे त्यावेळी मुख्य भूभागापासून अलग असलेल्या मुंबई बेटावरील परेलनजिक शिवडी येथील स्थानिक कोकणी शिल्पकार संघटनेचे सदस्य असले पाहिजेत.
डॉ. शिवराममूर्तीच्या मतांचा डॉ. स्पिंक यांनी खुलासेवार विस्तार केला. त्यानुसार विस्थापित वाकाटक कारागीरांनी घारापुरी येथील खोदकाम केले आहे हा खुलासा वाकाटक राज्यात काय घडेल त्यासंबंधीचा एका गंभीर आपसमजुतीवर आधारलेला आहे. त्याशिवाय घारापुरी आणि अजिंठा येथील शिल्पशैलीतील भेदाचीही दखल त्यात घेतलेली नाही. उत्तर कोकणात उच्च दर्जाच्या शिल्पिक कलेची सहाशे वर्षांची अखंड परंपरा होती. त्यामुळे घारापुरीचे भव्य शिल्प उभारण्यासाठी कारागीर वाकाटक राज्यातून उत्तर कोकणात येण्याची काहीच गरज नव्हती. घारापुरी येथील विलक्षण देखणी महेशमूर्ती किंवा गंगाधर, अर्धनारी, अंधकमूर्ती नटराज आणि मंदिराचे द्वारपाळ, यांच्याशी तुलना करता येईल असे काहीही अजिंठा येथे नाही. मात्र वेरूळ येथील रामेश्वर गुंफेत (गुंफा क्र. २१)काही वाकाटक प्रभाव पोचलेला जाणवतो. परंतु अजिंठ्याच्या विस्थापित कारागीरांना वेरूळ येथे काम पत्करावे लागले हे त्या प्रभावाचे कारण नव्हे.
अजिंठा
अजिंठा येथील सुप्रसिद्ध पाषाणगुंफमंदिरे, शिल्पे आणि गुंफा क्रमांक १६,१७, १ आणि २ या मधील विलोभनीय भित्तीचित्रे हा सुद्धा महाराष्ट्राचा दख्खन प्रदेशातील घारापुरीच्या आधीच्या काळापासुन वारसा.
ख्रिस्तपूर्व दुसऱ्या आणी पहिल्या शतकातील अनुक्रमे गुंफा क्रमांक १ आणि १० या सर्वांत आधीच्या गुफांपासून तो ख्रिस्तोत्तर ४८५ ते ५०० या काळातील गुंफा क्रमांक १६,१७ आणि १९ या गुंफापर्यन्तच्या अजिंठा येथील पाषाणगुंफा बौद्धपंथीयांच्या आहेत. क्रमांक १,२,आणि २६ च्या गुंफा बहुधा ख्रिस्तोत्तर ५२० ते ५४० या काळातील असाव्या. अजंठ्याच्या गुंफांचा कालानुक्रम हा वादग्रस्त विषय आहे. परंतु सोळा क्रमांकाच्या गुंफेमध्ये आढळणाऱ्या कोरीव लेखाचा योग्य अर्थ लावला तर असे कळते की वाकाटकांचा सचिव वराहदेव याने आपल्या वृद्धावस्थेत या गुंफेसाठी देणगी दिलि होती. ही गुंफा पुरी होण्यासाठी कमीतकमी पंधरा वर्षे तरी लागली असली पाहिजेत. ती पुरी झाल्यावर तिच्यात शिलालेख कोरवून आपल्या देणगीचा उल्लेख वराहदेवाने करवला असावा. पुष्कळदा असे सांगितले जाते की अजिंठा गुंफांतील चित्रकारी बुद्ध भिक्षूने व्यावसायिक चित्रकारांच्या बरोबर एखाद्या गुंफेच्या काही भाग रंगवलाही असेल. परंतु एरवी बहुतेक सगळी चित्रकारी वाकाटक राजांच्या आश्रयाला असलेल्या व्यावसायिक चित्रकार संघटनांमधील कलावंतांची आहे. त्यावेळी राजवाड्यांच्या आणि अन्य इमारतींच्या सजावटीसाठी धर्मनिरपेक्ष आशयाची चित्रे काढली असली पाहिजेत. अजिंठा गुंफांतून रंगवलेल्या बुद्ध-जातक कथाचित्रांतून वाकाटकांच्या दरबारी जीवनाचे - राजवाडे आणि नगरवेशी, मिरवणुका, त्याकाळातील खास पेहेराव केलेले उच्च वर्गातील स्त्री-पुरूष, नर्तक आणि गायक-वादक, शिकारी आणि राजसेवक यांचे दर्शन घडते. या सुंदर चित्रांना नेपथ्य आणि पार्श्वभूमी आहे देखण्या शिल्पित विहारांची. परंतु गेल्या शतकात या चित्राचा शोध लागण्यापूर्वीच काळाचा तडाख्यात त्यांना मोठी हानी पोचली होती. गुंफा जतन करण्यासाठी सद्‌भावाने पण अयोग्य रीतीने केलेले प्रयत्न, गुंफा पाहायला येणाऱ्या पर्यटकांची बेसुमार गर्दी आणि गुंफातील कृत्रिम प्रकाशाचा प्रखरपणा, यांच्यामुळेसुद्धा मागील काळात गुंफांना झळ लागली आहे. आता या सगळ्या गोष्टींत सुधारणा करण्यात येत आहे.
अजिंठ्याच्या चित्राचे, त्यांच्या सिद्धहस्त रेखांकनासाठी नेहमीच मोठे कौतुक केले जाते. परंतु त्यांच्या रूपशीलतेकडे कधीही दुर्लक्ष केले जाता कामा नये. ती साधण्यासाठी निरनिराळे खुबीदार उपाय योजले आहेत. मात्र त्या रंगछटांकन नाही. नाही म्हणायला गुंफा क्रमांक १ आणि २ या दोन उत्तरकालीन गुंफात तेवढा रंगछाटांकनाचा उपयोग केलेला दिसतो.
अजिंठ्यांबद्दल लिहिणाऱ्या अनेक समालोचकांचा एक असा विचित्र समज झालेला दिसतो की या गुंफा अत्यंत अल्प कालावधीत पुऱ्या झाल्या आहेत. परंतु हा समज मुख्यतः चुकीच्या गृहीतामुळे आणि भारतीय कलाकार संघांची कार्यपद्धती ठाऊक नसल्यामुळे झाला आहे. नाशिक येथील बालासिरी गुंफा अजिंठ्याच्या विहारंइतकी मुळीच संपन्न नाही. तथापि तेथे असलेल्या कोरीव लेखातील पुराव्यावरून असे निःसंदिग्धपणे लक्षात येते की ती पुरी होण्यासाठी तब्बल वीस वर्षांचा कालावधी लागला होता. आपण असे धरून चालू की राजाश्रय असलेले अनेकानेक पाथरवट आणि चित्रकार बौद्ध नवकर्मिकांच्या मार्गदर्शनाखाली अजिंठा येथे सातत्याने काम करत होत. तरीसुद्धा गुंफा क्रमांक १६, १७, १, २, आणि २६ यांच्यापैकी प्रत्येक गुंफा पुरी होण्यासाठी किमान पंधरा वर्षे तरी लागली असली पाहिजेत. आणि या सर्व गुंफाचे काम एकाच वेळी सुरू झाले असणे सुतराम संभवनीय नाही. क्र, १७ च्या गुंफेचे काम बहुधा ख्रिस्तोत्तर ४९० मध्ये सुरू झाले असावे; पण तोपर्यन्त सोळा क्रमांकाच्या गुंफेच्या कामाला पाच किंवा त्याहून अधिक वर्षे होऊन गेली होती. ही गुंफा म्हणजे वाकाटक राजा हरिषेण याच्या एका अज्ञात मांडलिकाची देणगी होय. वाकाटकांचा प्रख्यात सचिव वराहदेव याने दिलेल्या पवित्र देणगीचे अनुकरण करण्याची या मांडलिकाची इच्छा होती. आणि या बाबतीत त्याला सचिव वराहदेव आणी राजा हरिषेण या उभयतांकडून उत्तेजन मिळाले. त्या दोघांनी राजाश्रयित कलावंत संघांमधील पाथरवट, शिल्पकार, चित्रकार यांचे सहाय्य नक्कीच दिले असले पाहिजे. १६ क्रमांकाच्या गुंफेतील चित्रांत, शैलीच्या दृष्टीने पुष्कळच साम्य आहे. हे लक्षात येते, या साम्यस्थळांच्या आधारे, वाकाटक काळातील अजिंठा गुंफांचा काळ कोणता हे ठरवताना त्यांची वास्तुकलात्मक आणि शिल्पकलात्मक वैशिष्टयेच तेवढी विचारात घेतली तर आपली फसगत होईल. त्या वैशिष्टयांपेक्षा त्या गुंफांतील चित्रशैलीची वैशिष्टये कालनिश्चितीसाठी अधिक महत्त्वाची आहेत. असे आम्हाला वाटते. सतरा क्रमांकाची गुंफा ख्रिस्तोत्तर ५१० मध्ये पुरी झाली असली पाहिजे. तोपर्यन्त अजिंठ्यापासून सुमारे अकरा मैलांवर असलेल्या घटोत्कच येथे, वराहदेवाच्या अन्य देणगीने एका विहाराच्या उभारणीला सुरूवात झाली होती. त्या विहारात चित्रे मात्र कधीच काढली गेली नाहीत.
या टप्प्यावर महाकवी दण्डीच्या दशकुमारचरित या कथेची साक्ष काढणे युक्त होईल. दशकुमाचरितात ऐतिहासिक घटनांनाच साहित्यकृतीचा संबंध दिला आहे. हे कै. डॉ. मिराशींनी निर्णायकपणे सिद्ध केले आहे. दशकुमारचरिताच्या आम्ही लावलेल्या अन्वयार्थाप्रमाणे निष्कर्ष असा निघतो की ख्रिस्तोत्तर ५१० किंवा त्यानंतर थोड्याच वर्षांनी हरिषेणानंतर राज्यावर आलेला वाकाटक राजा अनाचारी निघाला. वाकाटकांच्या मांडलिकांनी एकत्र होऊन त्याचा पराभव केला; परंतु एका मुत्सद्दी सचिवाने, ( हा सचिव वराहदेवाशिवाय दुसरा कोण असू शकतो?), त्याच्या वृद्धपणी, पराभूत वाकाटक राजाच्या पुत्राला ख्रिस्तोत्तर ५२० मध्ये त्याचे गतवैभव परत मिळवून दिले. त्यानंतर क्रमांक १ आणि २ या विशाल बौद्ध गुंफा खोदण्यात आणी आकर्षकपणे चित्रांकित करण्यात आल्या. हे काम केले होते राजाश्रयित वाकाटक कारागीरांच्या संघांनी. कारण वाकाटक राजसत्तेच्या पुनःप्रतिष्ठापनेमुळे बौद्धविहारंच्या देणगीदारांना हे कारागीर पुन्हा एकदा उपलब्ध झाले होते. पण हे कारागीर म्हणजे १६ आणि १७ क्रमांकांच्या गुफांचे कारागीर नव्हेत. त्यांचे वारस किंवा शिष्य असले पाहिजेत. कारण १६ आणि १७ क्रमांकांच्या गुंफा आणि १ आणि २ क्रमांकाच्या गुंफा यांच्यातील मांडणी, आकृती-रेखाटन पशुपक्षी, वास्तुस्थिती अशा कलेच्या प्रत्येक पैलूत एका पिढीचे अंतर आहे, असे जाणवते. मात्र १ आणि २ क्रमांकाच्या गुंफा उभारणारे कलावंत हे १६ आणि १७ क्रमांकाच्या गुंफा उभारणाऱ्या कलावंताच्या संघामधलेच आहेत. त्यांनी चित्रकारीमध्ये, छटांकन, विशिष्ट शैलीबद्धता अधिक रूपशीलता साधण्यासाठी काळ्या केशसंभाराच्या पार्श्वभूमीवर चेहेरा रेखाटण्याची पद्धत या काही नवीन कल्पना आणल्या.
दण्डीच्या दशकुमारचरिता खऱ्या नावांचे जरी गोपन केले असले तरी वाकाटकांचा इतिहास हाच त्याचा गाभा आहे, हे उघड आहे. वाकाटकांचे आधिपत्य लयाला गेल्यावर दीडशे वर्षे हा दण्डीचा काळ आहे. त्याकाळी ऐतिहासिक घटना सर्वविदित असल्या पाहिजेत; आणि फारशा जुनाट न झालेल्या परंपरेने त्यांचे तथातथ्य (आणि विश्वासार्ह) संक्रमणा झाले असले पाहिजे. अजंठा-घटोत्कच प्रकल्पातील कित्येक वैशिष्टये दण्डीच्या तपशीलाला पूरक आहेत. योग्य अन्वयार्थ लावलेले दशकुमारचरित आणि पुढील परिस्थितीजन्य पुरावा यांची सांगड घालता येते:
(अ) अपुऱ्याच राहिलेल्या आणि चित्रांकित नसलेल्या घटोत्कचयेथील विहाराचे खोदकाम निःसंशय, १६ क्रमांकाच्या गुंफा-उभारणीच्या कामाची चांगली प्रगती झाल्यानंतरच सुरू झाले असले पाहिजे.
(आ) घटोत्कच गुंफा आणि नंतरच्या काळातील १ क्रमांकाची गुंफा यातील वास्तुशास्त्रीय साम्य आणि घटोत्कच-गुंफा या दोन्हीतील कोरीव लेख.
(इ) अजिंठा येथील १६ व १७ क्रमांकाच्या गुंफा.
(ई) १६ आणि १७ क्रमांकंच्या तुलेनेने १ आणि २ क्रमांकांच्या गुंफातील चित्रांत आढळणारे तपशीलवार चित्र रेखाटण्याचे तंत्र.
प्रस्तुत पुराव्याची सांगड दशकुमारचरिताशी घातली तर पुढील निष्कर्ष निघतात:-
१) वाशिम शाखेच्या श्रेष्ठ वाकाटक राजाची-हरिषेणाची-कारकीर्द ख्रिस्तोत्तर ४७५ ते ५१० अशी होती असे अनेक अभ्यासक योगयपणे मानतात, आणि हे मत आम्हालाही स्वीकारणीय वाटते. राजा हरिषेणाचा वराहदेव नावाचा मुख्य सचिव होता. वराहदेवाने काही काळ हरिषेणाच्या पित्याच्या-देवसेनाच्या-पदरी चाकरी केली होती असे दिसते. वराहदेवाचे वडील हस्तीभोज हे देवसेनाचे सचिव होते.
२) अजिंठा येथील १६ क्रमांकाच्या गुंफेतील वराहदेवाच्या कोरीव लेखाचा यथायोग्य अन्वयार्थ लावला तर असे समजते की बुद्धाबद्दलच्या एकनिष्ठ भक्तिभावामुळे, आपल्या परिपक्व वृद्धपणी, वराहदेवाने १६ क्रमांकाच्या गुंफा-विहारला देणगी दिली होती. या गुंफा-विहाराच्या कामाचा आरंभ ख्रिस्तोत्तर ४८०-४८५ पूर्वी झाला असणे असे शक्य नाही; तशीच त्यांची समाप्तीही ख्रिस्तोत्तर ४९५-५०० पूर्वी झाली नसावी.
३) क्रमांकाच्या गुंफेचे काम करणारे वास्तुशास्त्रज्ञ, शिल्पकार, चित्रकार यांचे संघ वाकाटक राजांच्या प्रत्यक्ष सेवेतील होते किंवा राजाश्रयित होते आणि त्यामुळे वराहदेवाला गुंफाकामासाठी सहज उपलब्ध होणारे होते. त्या अगोदर या कारागीर संघांनी वाकाटकांचे राजवाडे, दरबार दालने, इतर इमारती आणि त्यातील भित्तीचित्रे यांचे पुष्कळ काम केले होते. यात संशय नाही. १६ आणि १६ क्रमांकांच्या गुंफांतील चित्रांवरून हे सहज स्पष्ट होते. अजिंठ्याची चित्रे भिक्षू-चित्रकारांनी काढली आहेत. या मताचा गंभीरपणे विचार करण्याचे मुळीच कारण नाही. कदाचित, अगदी मोजक्या काही वेळा, चित्रकारी अवगत असलेल्या एखाद्या भिक्षूने, व्यावसायिक चित्रकारांच्या संगतीने, क्वचित काही आकृती चितारल्याही असतील. असा एक भिक्षू-चित्रकार गांधार देशाहून आला असणेही संभवनीय आहे.
४) १६ क्रमांकाची विहार-गुंफा ज्यावेळी खोदली जात होती, शिल्पित आणि चित्रांकित होत होती, त्याच वेळी सचिव वराहदेवाच्या सदाचाराचे अनुकरण करण्याच्या इच्छेने हरिषेणाच्या संपूर्ण सहकार्याने, कोण्या बुद्ध भिक्षूवर्गासाठी १७ क्रमांकाच्या गुंफा-विहाराची खोदाई आणि सजावट सुरू केली असावी, असे दिसते. परिणामी या मांडलिकाला वाकाटकांच्या वास्तुशास्त्रज्ञाच्या, शिल्पकारांच्या आणि चित्रकारांच्या संघाचे कसब गुंफा कामासाठी लाभले. या संघामध्ये कारागीर मोठ्या संख्येने असले पाहिजेत, आणि १६ क्रमांकाच्या विहार-गुंफेच्या कामात त्यांपैकी सगळेच्या सगळे कारागीर गुंतून पडलेले नसावे. १७ क्रमांकाच्या गुंफाविहारातील कोरीव लेखांमध्ये त्या मांडलिकाचे नाव सापडलेले नाही.
५) १६ आणि १७ क्रमांकाच्या गुंफा बांधल्या आणि सजवल्या जात असतानाच, वराहदेवाने आपल्या उत्कट श्रद्धेने अजिंठ्याच्या ठिकाणापासून अकरा मैल अंतरावर घटोत्कच येथे देणगीने आणखी एका विहार-गुंफेच्या उभारणीला सुरूवात केली. ही विहार-गुंफा जरी अपुरीच आणि चित्रविरहितच राहिली असली तरी वाकाटक काळातील अजिंठा गुंफांचा अचूक कालानुक्रम ठरवण्यासाठी आणि दण्डीचा वृतान्त पडताळून पाहण्यासाठी, ती अत्यंत महत्वाची आहे. घटोत्कच येथील विहार-गुंफा सदाची अपुरीच आणि अचित्रांकितच राहिली याचे कारण आपल्याला दण्डीच्या वृतान्तावरून समजू शकते. श्रेष्ठ वाकाटक राजा हरिषेण याच्या मृत्यूनंतर राज्यावर आलेला त्याचा वारसदार दुबळा आणि चारित्रशून्य होता. अनाचारी वर्तनामुळे आणि पित्याच्या शहाण्या, वृद्ध, विश्वासू सल्लागारांचा सल्ला न मानल्यामुळे विश्वासघातकी मांडालिकांनी त्याला सिंहासनावरून पदच्युत केले.
वाकाटक-इतिहासातील या दुर्दैवी घटनेमुळेच घटोत्कच येथील गुंफा काम स्थगित झाले यात संशय नाही. वाकाटकांचे राज्य उलधून पडण्याचा हा प्रकार १६ आणि १७ क्रमांकांच्या विहारांचे काम पुरे झाल्यानंतर, ख्रिस्तोत्तर ५१० मध्ये, घडूनआला असावा. खिर्स्तोत्तर ४८५ किंवा ४९० मध्ये १६ क्रमांकाच्य विहार-गुंफेचे कामसुरू झाल्यानंतर सुमारे पाच वर्षांनी १७ क्रमांकाच्या विहार-गुंफेच्या कामाला प्रारंभ झाला असे मानले तर १७ क्रमांकाची विहार-गुंफा लौकरात लौकर म्हणजे ख्रिस्तोत्तर ५०५ किंवा ५१० मध्येच पुरी होणे शक्य आहे. कारण वाकाटक कारागीर-संघामधल्या कारागिरांचे भरपूर संख्येने सहाय्य असले तरी सुद्धा यापैकी कोणतीही गुंफा प्रत्येकी पंधरा वर्षापेक्षा कमी कालावधीत पुरी होणे शक्य नाही. भारतीय कारागीर, अगदी आजच्या काळात सुद्धा, किती धीम्या गतीने काम करतात याची कल्पना नसणाऱ्या पाश्चात्यांना या कारागीरांची प्रवृत्ती समजू शकत नाही. त्यामुळे, बाघ, अजिंठा आणि घटोत्कच इत्यादी ठिकाणी असणाऱ्या विहार-गुंफा अशक्यप्राय अल्प कालावधीत उभारण्यात आल्या असे मानताना आपली फार मोठी चूक होते आहे. हे त्या पाश्चात्यांच्या लक्षात येत नाही.
६) दण्डीच्या वृतान्तावरून आपल्याला समजते की वाशीम शाखेच्या वाकाटकांच्या अंमलात मधेच खंड पडला. परंतु एका वृद्ध सल्लागाराने आपल्या दुर्दम्य आत्मबळाने अन्य राजांच्या साहाय्याने अखेर वाकाटकांचे गमावलेले वैभव पुन्हा प्रस्थापित करण्यात यश मिळविले. (हा सल्लागार वराहदेव हाच असणार.) १६,१७, १ आणि २ या सर्व वाकाटक गुंफा सुमारे पंधरा वर्षात, साधारणतः ख्रिस्तोत्तर ४८५ मध्ये पुऱ्या झाल्या, असे प्रतिपादन करणारी विविध अभ्यासकांची मते दण्डीच्या कथनामुळे खोडली जातात. हरिषेणाच्या कारकीर्दीचे आरंभवर्ष ख्रिस्तोत्तर ४७५ पेक्षा मागे सरकवणे, अप्रयोजक होय.
७) ख्रिस्तोत्तर ५१० च्या सुमारास जरी वाकाटक आधिपत्यात खंड पडून त्यामुळे वराहदेवाच्या त्याचा आश्रयाखाली असलेल्या घटोत्कच विहाराचे काम स्थगित झाले असले तरी त्याचा अर्थ असा नव्हे की कारागिरांचे संघ तडकाफडकी विस्कळित व कार्यशून्य झाले. या खंड काळात अन्य राजांचा अंमल वाकाटक प्रभावक्षेत्रावर असताना हे कारागीर संघ विविध बांधकाम-योजनांवर कामाला असले पाहिजेत. कदाचित ही लाकडी बांधकामे असून आता त्यांचे अस्तित्व मागे राहिले नसावे. १६ आणि १७ क्रमांकाच्या गुंफातील कामावर अखेरचा हात फिरवण्यातही ते गुंतून पडले असण्याची शक्यता आहे. परंतु वराहदेवाच्या घटोत्कच गुहेचे काम त्यांनी पुष्कळ प्रमाणात सोडून दिले असावे.
८) वाकाटक राज्य बळकावून घेणाऱ्यांच्या सुमारे दहा वर्षाच्या अंमलानंतर जेव्हा ख्रिस्तोत्तर ५२० मध्ये वाकाटक राजघराण्याचे गतवैभव पुन्हा प्रस्थापित झाले तेव्हा वृद्ध सचिव वराहदेव किंवा त्याचा अनुगामी किंवा अशाच कोण्या सत्प्रवृत्त देणगीदारांनी कोठल्यातरी बौद्ध भिक्षू श्रेणीसाठी अंजिठा येथील वराहदेवाचे कल्याणकारी कार्य पुन्हा सुरू केले असावे. त्यातून १ आणि २ क्रमांकाच्या गुंफा खोदल्या गेल्या घटोत्कच गुंफा पुरी करण्यात आणि चित्रांकित करण्यात फारसे स्वारस्य आहे असे बहुधा वाटलेनसावे. कदाचित ज्या भिक्षू श्रेणीसाठी ती मुळात योजली होती तिला ते स्थान त्यावेळि सोयीचे वाटलेनसेल, किंवा या निर्णयाला अन्य काही कारण असू शकेल. कसेही असले तरी एवढे निश्चित आहे की वाकाटकांचे गतवैभव पुन्हा प्राप्त झाल्यावर वराहदेवाच्या वंशजाने अथवा वराहदेवानंतरच्या सचिवाने, त्याच्या आदर्शाला अनुसरत कोण्या बौद्ध भिक्षू बिरादरीसाठी अजिंठा येथे आधी १ क्रमांकाची आणि काहीकाळानंतर २ क्रमांकाची अशी दोन विहार गुंफा खोदवल्या, शिल्पित आणि चित्रांकित केल्या.
येणे प्रमाणे ही गोष्ट स्पष्ट आहे की वाशीम शाखेच्या वाकाटकांच्या राजकीय वर्चस्वात काही काळ खंड घडला होता, आणि सुमारे एका दशकाने सत्ता पुन्हा त्यांच्याकडे आली. आणि ही घटना अप्रत्यक्षपणे अजंठा-गुफांत प्रतिबिंबित झाली आहे. तेथे १६ आणि १७ क्रमांकाच्या गुंफांची समाप्ती आणि १आणि २ क्रमांकांच्या गुंफांची सुरुवात, यात आपल्याला पंधरा ते वीस वर्षाचा खंड पडलेला जाणवतो. एकाच कारागीर संघाच्या शैलीमध्ये कालांतराने बदल घडणे ही घटना अपरिहार्यच आहे. हे लक्षात घेऊन आम्हाला असे सुचवावेसे वाटते की १ आणि २ क्रमांकांच्या गुंफांची सुरूवात, ख्रिस्तोत्तर ५२० ते ५२५ मध्ये, म्हणजे १६आणि १७ क्रमांकांच्या गुंफाच्या समाप्तीनंतर पंधरा ते वीस वर्षांनी झाली असावी. १ आणि २ क्रमांकांच्या गुंफा ख्रिस्तोत्तर ५४० ते ५४५ च्या सुमारास पुऱ्या झाल्या असल्या पाहिजेत. अर्थात हे आकडे अगदी नेमके नाहीत.
१ क्रमांकांच्या गुंफेनंतर काही काळाने उभारलेली २ क्रमांकाची गुंफा ही अजंठा येथील शेवटची चित्रांकित गुंफा होय. यानंतरच्या काळातील चित्रांकित गुंफा नसली तरी वाकाटकांचे साम्राज्य अस्ताला गेल्यानंतरसुद्धा अजिंठा येथे काही काम चालू राहिले असावे असे दिसते.
अखंड चालणाऱ्या मानवी व्यवहारांनी गजबजलेल्या विशाल दरबारी जीवनाच्या जोडीला साधुतेच्या आणि बौद्ध-श्रद्धेच्या कथांनी अजिंठ्याच्या भिंती रंगल्या आहेत. हे दर्शन परमेश्वराचे नाही; विविध पैलूंनी नटलेल्या बहुरंगी जीवनाचेच हे दर्शन आहे.
आजच्या महाराष्ट्रात, देशावर वा कोकणात कोठेही, असलेल्या गुंफानिवासांचा आणि गुंफा-मंदिरांचा आढावा घेतल्यावर आम्हाला असा निष्कर्ष काढावासा वाटतो की या विशाल स्मारकांच्या उभारणीला ज्यांचा हातभार लागला ते पाथरवट, शिल्पकार चित्रकार ही याच भूमीची लेकरे होती. वाकाटक कारागीरसंघ जरी फक्त देशविभागातच कार्यरत असले आणि देशावर नसले तरीसुद्धा कोकण आणि देशावरील पाषाणात खोदलेल्या वास्तुशिल्पात, मर्यादित प्रमाणात का होईना, पण शैलीची एकात्मता दिसते. त्यावरून या संघांचा काही परस्पर संबंध असावा असे अनुमान करावेसे वाटते. हा संबंध नेमकपणाने सांगणे सोपे नाही,
वेरूळ
गुंफा मंदिरांपैकी शेवटचा महत्त्वाचा आणि ज्याची दखल घेतली पाहिजे असा गट म्हणजे वेरूळ येथील गुंफा मंदिराचा. २१ क्रमांकाची, रामेश्वर गुंफा म्हणून प्रसिद्ध असलेली ब्राह्मणी गुंफा, ही या गटातील सर्वात प्राचीन गुंफा होय या गुंफेवर, अजिंठा येथील, उत्तरकालीन वाकाटक शैलीचा प्रभाव पडलेला आहे असे लक्षात येते; आणि तो बहुधा १ आणि २ क्रमांकांच्या अजिंठा गुंफा ख्रिस्त्तोत्तर ५५० च्या सुमारास पुऱ्या झाल्यानंतरच्या म्हणजे सहाव्या शतकाच्या उत्तरार्धातील असावा, या गुंफेतील सप्तमातृकांचा शिल्पपुंज, अजिंठ्याच्या भीत्तीचित्रांचा प्रभाव विशेष ठळकपणे अभिव्यक्त करतो.
वेरूळची ख्याती आहे ती ख्रिस्तोत्तर आठव्या शतकातील राष्ट्रकूटांच्या वास्तुकलेचा आणि शिल्पकलेचा अत्युत्कृष्ट नमुना असलेल्या भव्य कैलासनाथ पाषाणमंदिरासाठी. वेरूळ येथे बौद्ध, ब्राह्मणी आणि जैन तिन्ही पाषाणवास्तू आहेत; मात्र त्या भिन्न भिन्न काळातील आहेत. येथील बांधकाम धार्मिक विद्वेषाशिवाय केले गेले आहे असे दिसते. एका धर्मपंथीयांनी दुसऱ्यांच्या वास्तूचा विध्वंस करण्याचा प्रयत्न करणे हाही प्रकार येथे झालेला नाही. खरे म्हणजे ज्या वस्तुस्थितीचे दखल अभ्यासकांनी क्वचितच घेतलेली आहे ती वस्तुस्थिती अशी की ज्या वास्तुच्या पहिल्या मजल्यावर दशावतार गुंफेतील (गुंफा क्रमांक १४) देखणी शिल्पे आहेत ती वास्तु मुळात, दो-थळ-तीन-थळ यासारख्या अनेक मजली बौद्ध बांधकामाच्या धर्तीवर आरंभिलेल्या बौद्ध विहाराची वास्तू आहे. काही कारणासाठी विहाराचे काम अपुरेच सोडून देण्यात आले आणि नंतर त्याचे जोत्याचा आधार घेऊन आठव्या शतकातली, आज दशावतार-गुंफा या नावाने प्रसिद्ध असलेली भव्य ब्राह्मणी सज्जा-शिल्प गुंफा उभी राहिली आहे. वेरूळ येथील बौद्ध चैत्य, ही पारंपारिक चैत्य वास्तुशिल्पातील अभिनव गोष्ट आहे. अजिंठ्याच्या अखेरच्या दिवसांपासून शिल्पशास्त्रीय कल्पनात झालेल्या प्रगतीची ती द्योतक आहे. सीता का मकणी (गुंफा क्रमांक२९) या नावाने लोकात ओळखले जाणारे धुमार लेणे विशेष लक्षणीय आहे. त्याची लक्षणीयता अशी की घारापुरी येथील भव्य शिल्पाचे अनुकरण करण्याचा यत्न तेथे आहे. अर्थात हे लेणे बरेच उत्तरकालीन, म्हणजे बहुधा आठव्या शतकातील, असावे. येथील शिल्प प्रभावी आहे; परंतु शिल्पिक गुणवत्तेमध्ये घारापुरीच्या शिल्पाची ते थोडीसुद्धा बरोबरी करू शकत नाही. हे लेणे घारापुरीच्या आधीच्या काळातले आहे असे मानणाऱ्या काही लेखकांची उघडच फसगत झाली असावी. आता हे मत कोणी स्वीकारार्ह मानीत नाही. वेरूळ येथील, मुख्य जैन गुंफेतील मातंग आणि सिद्धायिक यांची शिल्पे, त्याचप्रमाणे बाहुबली शिल्प, जरी या जैन गुंफा नवव्या शतकातील असल्या तरी, शिल्पिक गुणवत्तेच्या दृष्टीने प्रशंसनीय आहेत. वेरूळ येथील कैलासनाथ मंदिर आणी ३२ क्रमांकाची जैन गुंफा या दोन्ही ठिकाणी नवव्या शतकातील चित्रेही आहेत.
भारतातील तीन श्रेष्ठ धर्मपंथीयांच्या महाराष्ट्रातील महनीय आणि असामान्य अशा पाषाण गुंफांमधील वास्तुशास्त्रीय आणि शिल्पकलात्मक कामगिरीचा पूर्णविराम म्हणजे वेरूळची लेणी. या कामगिरीला उभ्या भारतात कोठेही तोड नाही.


दैनंदिन जीवनातील कला

अंजली मुनशी

Main Building of J.J School of Art, Mumbai(Maharashtra,India)

महाराष्ट्राला पुरातन वस्तूंचा आणि पुरातन कला अवशेषांचा फार मोठा समृद्ध आणि वैभवशाली वारसा लाभला आहे. इतिहासपूर्व व त्यानंतरच्या काळातील आणि ऐतिहासिक कालांतील विविध संस्कृतीच्या उदयास्ताच्या खुणा आणि अवशेष या भूमीतील त्या त्या काळाच्या विविध स्तरांचे असल्याचे उत्खननात आणि संशोधनात आढळून आले आहे. संस्कृतीच्या या मूक साक्षीदारंनी येथील संस्कृतीचा इतिहास बोलका केला आहे.

पैठण, तेर, इनामागांव अणि महुरझरी येथे केकेल्या उत्खननात आणि संशोधनात येथील संस्कृतीच्या व लोकजीवनाच्या विविध पैलूंचे घडविणाऱ्या अनेक वस्तू आणि कलावशेष सापडले आहेत. यामध्ये, फुटलेली मातीची भांडी आणि त्यांचे तुकडे, मणी बांगड्याचे तुकडे, कलावशेष , अवजारे, नेहमीच्या वापरातील, भांडी, टेराकोटाच्या मुद्रा त्याचप्रमाणे हस्तीदंती, हाडाच्या, धातूच्या आणि लाकडाच्या वस्तू आणि शिल्पे आहेत. समाध्या आणि इतर पवित्र ठिकाणॆ कोरलेले शिलालेख, ताम्रपट, तसेच इतर अनेक ठिकाणी कोरलेली बोधचिन्हे आणि लेख यांचाही इतिहासाच्या या अमोल साधनात समावेश आहे.

प्राचीन काळातील स्त्री-पुरुषांचे जीवन कसे होते, त्यावेळचे लोक कसे राहात, काय खात, त्यांच्या संवयी कोणत्या होत्या. धर्म, तत्वज्ञान, कला आणि सौन्दर्य, विज्ञान आणि तंत्रविद्या तसेच ज्ञानाच्या इतर विविधा शाखा यांबाबत त्यांचे विचार आणि संकल्पना कोणत्या होत्या याची कल्पना उत्खननात व संशोधन सापडालेल्या या विविध वस्तूंवरून येते. प्राचीन काळातील हा धार्मिक वारसा नंतरच्या काळात बौद्ध , जैन आणि हिंदूंच्या निवासी गुफांत, लेणी गुंफा मंदिरे आणि विहार व त्यानंतरच्या काळात मंदिरे आणि वैभवशाली प्रासादांच्या रूपाने अधिक संपन्न झाला आणि संस्कृतीचा हा नंदादीप अखंड तेव्त राहिला.

संस्कृतीच्या अरुणोदयापासूनच खळाळणाऱ्या शुभ्रधवल लाटांनी किनारपट्टीची भेट घेण्यासाठी आतुर झालेल्या अरबी समुद्राचे सान्निध्य महाराष्ट्राला लाभले आहे. सागराच्या या सान्निध्यामुळे सागरी उद्योगाला गती मिळाली, त्यामुळे मच्छिमार उद्योग आणि परदेशांबरबरीत व्यापार-उदिमाची प्रगती होऊ लागली.

खुष्कीचे मार्गही महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून इतर विभागांत पोहोचले. सागरी आणि खुष्कीच्या मार्गाने होणाऱ्य दळणवळणामुळे विविध जातींचे एकमेकांशी संमीलन झाले. परदेशी संस्कृतेशी घनिष्ठ संबंध आला आणि विभागातील परंपरेला एक आगळी झळाळी आली.

या सर्व गोष्टींचा महाराष्ट्रातील कला आणि सौंदर्यविषयक कल्पनांवर फार मोठा प्रभाव पडला . खानदानी अभिजातकला आणि शास्त्रीय संगीताने लोककला, लोकसंगीत व लोकजीवनातील रासवट आणि रांगद्या सौन्दर्याशी सलगी केली. महाराष्ट्रातील लोकांच्या दैनंदिन जीवनातील कला आणि सौन्दर्याच्या आजच्या आविष्काराशी त्या अथांग प्राचीनाचे अतूट नाते आहे.

महाराष्ट्रातील दैनंदिन जीवानात, लोकांच्या आचारविचारांत या प्राचीन सांस्कृतिक वारशाचा ठसा खोलवर उमटला आहे. हा समृद्ध वारसा हाच येथील लोकजीवानाचा पाया आहे. येथील जीवनाला सस्कृतीचा ताल आणि परंपरेचा नाद आहे. महाराष्ट्राचा दैनंदिन जीवनाचा हा ओघ पिढ्या न्‌ पिढ्या चालू आहे. महाराष्ट्रातील सर्वसामान्य मानसाची दिनचर्या अगदी रामप्रहरापासून सुरू होते. मुखमार्जन, तेल लावून अभ्यंगस्नान, केशभूषा, सुंदर पेहराव, प्रसाधन करून, आणि आभरणांनी नटूनथटून झाल्यावर दैनंदिन कामासाठी तयारी होते. तुळशीचा पाणी, दारापुढे रांगोळी, दाराखिडक्यांवर तोरणे बांधून दिवसाच्या स्वागताची तयारी होते. खास सण आणि उत्सवाच्या वेळी भिंतीवर मंगल चिन्हेआणि देवदेवतांच्या आकृतीही चितारल्या जातात.

षोडषोपचार पूजा हा दिनचर्येतील एक महत्वाचा भाग असतो. देवघरातील देव्हाऱ्यात देवदेवतांच्या अनेक छोट्या मूर्ती आणि पवित्र चिन्हे यांची यथासांग पूजा केली जाते. पवित्र गंगाजलाने देवांना स्नान घातले जाते. त्यानंतर, दूध, दही, तूप, मध आणि साखा यांपासून सिद्ध केलेले पंचामृत देवांच्या अंगाला लावून त्यांना अभिषेक करतात. अभिकेषकानंतर देवांना स्वच्छ वस्त्राने पुसून त्यांना चंदन, हळद-पिंजर, अबीर-गुलाब लावण्यात येतो. त्यानंतर देवांवर अक्षत आणि फुले, तुळशी आणि बिल्वपत्रे वाहिली जातात. त्यानंतर धूप आणि शुद्ध तेलातुपातील दीप उजळला जातो. नंतर देवाला नैवेद्य अर्पण करतात आणि मग आरती होते. केव्हाकेव्हा झांज, टाळ, चिपळ्या , मृदंग, तंबोरा आदी संगीत वाद्यांची नादमधुर साथही आरतीला असते. आरतीनंतर मंत्रघोषात देवाला मंत्रपुष्पांजली होऊन पूजेची सांगता होते.

या षोडषोपचार पूजेच्या पूजासाहित्यात अभिषेक पात्र, तांब्यापळी, पंचपात्र यासारखी भांडी, करंडा, आरती-तबक, निरांजन, समई, कर्पूर पात्र (पंचारती), धूपपात्र, फुले ठेवण्यासाठी तबके किंवा परड्या आदी अनेक वस्तू असतात. त्यांचा घाट आकर्षक आणि जडणघडण कलात्मक असते.

घरातील या दैनंदिन पूजेखेरीज काही खास मंगल प्रसंगी काही विशिष्ट देवदेवतांच्या खास पूजाही करतात. गणेश-चतुर्थी, चैत्रगौरी, मकरसंक्रांत, दीपावली, दसरा, गुढी पाडवा आणि वसंतपंचमी मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी होतात.

जन्मापासून तो मृत्यूपर्यंत माणसावर एकूण निरनिराळे सोळा संस्कार येतात. यापैकी प्रत्येक संस्कारात शास्त्रवचनप्रमाणे विविध धार्मिक विधी करण्यात येतात.

दैनंदिन जीवनातील नेहमीच्या पूजाअर्चा आणि धार्मिक कृत्यांखेरीज आणखी अनेक धार्मिक परंपरा आणि उत्सव साजरे होतात क्रीडा, नृत्य, नाट्य, संगीत आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचा यावेळी जल्लोष उडतो. या आनंद महोत्सवात आणि जल्लोषात कलाविष्काराचे विव्ध पैलू उजळून निघतात. दिअन्म्दिन जीवनही सौन्दर्य आणि कलास्वादात व भावविश्वात रंगून जाते. मानवाचे हे भावविश्व आणि भावना दैनंदिन वापराव्या वस्तूंमध्येहि कलात्मकारीत्या प्रतिबिंबित झाल्या आहेत. वस्तूंचा आकार आणि घाट केवळ तिच्या उपयोगाचाच नव्हे तर तो अधिक सुंद्र कशी दिसेल याचा विचार करून घडविण्यात येतो. एखाद्या विशिष्ट अर्थ सांगण्यासाठी संबंधित वस्तूंवरील कलाकौशल्यात विशिष्ट चिन्ह आणि आकृतीबंध वापरला आहे.

वैभवशाली गतकालीन अवशेषांत त्या त्या काळाच्या कलावंताच्या व कारागिरांच्या मनमोहक कलेचे आणि कारागिरीचे प्रतिबिंब उमटले आहे. किरकोळ शरीरयष्टीच्या, पण सळसळणाऱ्या उत्साह असलेल्या दॉ. दिनकर केळकरांनी दैनंदिन जीवनातील कलावस्तूंचा संग्रह करण्याच्या कार्याला अक्षरशः वाहून घेतले आहे. त्यांच्या हा वस्तूसंग्रह त्यांच्याच मुलाचे नाव दिलेल्या वस्तूसंग्रहालयात मांडून ठेवळा आहे. अत्यंत परिश्रम घेऊन गोळा केलेल्या आणि मातेच्या ममतेने जोपासलेल्या, महाराष्ट्रातील दुर्मिळ आणि अजब नमुन्यांच्या हा कलावस्तू संग्रह पाहिल्याखेरीज महाराष्ट्राच्या कलावैभवाच्या आणि लोकजीवनाच्या अंतरंगाचे मर्म उमजणार नाही आणि त्यांच्या विशाल वैचित्र्याची कल्पनाही येणार नाही.

दिनकर केळकरांना 'काका' या लाडक्या नावाने ओळखले जाते. वस्तूसंग्रहालयाला भेट देणाऱ्यांचे ते आवर्जून स्वागत करतात आणि त्यांच्याशी काकांची गट्टी हां हां म्हणता जुळून जाते. ८९ वर्षांच्या या चिरतरुणाच्या अम्गात अमाप उत्साह आणि जिद्द आजही सळसळत असून, आपल्या संग्रहाबद्दलचा सार्थ अभिमान त्यांच्या नजरेतून ओसंडताना दिसतो. आपले अनुभव आणि उद्देश सांगताना त्यांचा हा सार्थ अभिमान त्यांच्या नजरेत सतत डोकावताना दिसतो.

रणझुंजार पहिल्या बाजीरावाची प्रियतमा दरबारी नर्तिका मस्तानी हिच्या वाड्यातील दिवाणखान्याचे साक्षात्‌ दर्शन घडविणारे कलादालन हे या वस्तूसंग्रहालयातील सर्वात वैशिष्टयपूर्ण दालन होय. मस्तानीच्या वाड्यातून हा दिवाणखाना जसाच्या तसा इथे हलविण्यात आला आहे. वास्तूशिल्पातील नाजूक शिल्पकला, लाकडावरील नक्षीकाम आणि भित्तीचित्र यांचे या दालानातील उत्कृष्ट नमुने पाहाणाऱ्याचे लक्ष खिळवून ठेवतात. या दालनाच्या कलात्मक सजावटीतून दरबारी राणीच्या घराचे दर्शनासाक्षी वातावरण निर्माण केले आहे. मस्तानीचे काचेवरील एअक चित्रही या संग्रहालयात आहे.मराठी दरबारी नर्तिकेचे पाश्चात्य पेहरावातील हे एक अनोखे चित्र आहे.
काही दालनांत सूक्ष्म चित्रे, सचित्र हस्तलिखिते आणि चित्रकथीची चित्रे आहेत. चैत्र महिन्यात पूजोत्सव होणाऱ्या चैत्रगौरीच्या सन्मानार्थ कापडावर चितारलेला चैत्रगौरीपटाचे चित्रही लक्ष वेधून घेणारे आहे.

दगडी, लाकडी, टेराकोटा आणि धातूच्या मूर्तीत, पंचमुखी हनुमानाची मूर्ती नाट्यपूर्ण आहे. देवदेवतांच्या तसेच वन्य लोकांच्या ग्रामदेवतांच्याही अनेक मूर्ती या संग्रहालयात आहेत.

वैशिष्ट्यपूर्ण आणि सहसा न आढळणारे अजब प्रकारचे दिवे हे या संग्रहालयाचे एअक खास वैशिष्ट्य होय. त्यासाठी तो प्रसिद्धही आहे. वृक्षदीप या नावाने ओळखण्यात येणारा १९ व्या शतकातील, झाडाच्या आकारातील दिवा. अंजनेयाचा हातातील पितळी दिवा , गणपतीचे वाहन असलेल्या मूषकावरील फुलांच्या अनेक पाकळ्यांना २० व्या शतकातील दिवा, दीप लक्ष्मी दिवे आणि लामण दिवे आदि अनेक प्रकारचे दिवे या संग्रहात आहेत. यापैकी काही दिव्यांवर महाराष्ट्रीय संस्कृतीची छाप आहे. या दिव्यांवर उत्कृष्ट नक्षीकाम असून देवदेवता, मानवी आकृत्या, पशुपक्षी यांची चित्रे कोरलेली आहेत.

जीवनात रंग भरणाऱ्या विड्याला महाराष्ट्रात एकाअगळेच स्थान आहे. साहजिकच, विड्याचे साहित्य, विड्याची पाने, सुपारी कातणारा अडकित्ता, पानदान आणि चुन्याची डबी हा येथील जीवनाचाच एअक अविभाज्य भाग बनला आहे. पुणे, नाशिक ही विड्याच्या पानांसाठी विशेष प्रसिद्ध आहेत. येथेच विविध पानदाने, चुन्यांच्या डब्या आणि अडकित्ये तयार होतात.

बदामाच्या आणि भोपळ्याच्या आकाराच्या पानदाण्या, दुहेरी मोराची कलाकृती कोरलेल्या चुन्याच्या पितळी डब्या ह्या चालू शतकातील आहेत. देवदेवता, शृंगारचेष्टा करणारी युगुले, विशेषतः रती-मदन, पशुपक्षी, फळेफुले आणि मानवी आकृती असलेले अडकित्ये सामान्यतः पितळी असून ते १८ ते २० व्या शतकातील काळाच्या विविध टप्प्यांतील आहेत. एकोणिसाव्या शतकातील एका पितळी अडकित्यावर स्त्री-पुरुष आणि बालक असलेल्या एका कुटुंबाचे कोरलेले चित्र म्हणजे कारागिरीचा उत्कृष्ट नमुना आहे.

या संग्रहालयातील लेखन साहित्याशी संबंधित असलेल्या वस्तूंपैकी दौती आणि कलमदाण्या पहिल्या शतकापासून तो आजच्या काळापर्यंतच्या असून त्यांची कारागिरी आणि सफाई उत्कृष्ट आहे.

या संग्रहातील प्रसाधन साधनात अंग घासण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वज्री आहेत. महाराष्ट्रातील उत्खननात त्या सापडल्या असून त्या सामान्यतः पितळेच्या असतत, वज्रीच्या वरील भागावर पशुपक्षी आणि मानवी कलाकृती आहेत. यापैकी एक वज्री पाय घासण्यची असून तिच्यावर एकमेकाच्या मानेत मान घालून समोरासमोर उभ्या असलेल्या दोन मोरांचे चित्र आहे.

फावल्या वेळात संगीत ऐकण्याचा शौक हाही येथील जीवनाचा अविभाज्य भाग आहे. या वस्तूसंग्रहालयाच्या एका खास दालनात सहसा न आढळणारी आणि निवडक संगीत वाद्ये ठेवण्यात आली आहेत. बीन, तबला, ढोल, शहनाई य सुप्रसिद्ध वाद्यांखेरीज वन्य जमातीची संगीतवाद्येही येथे पहावयास मिळवतात.

संग्रहालयातील गृहोपयोगी वस्तूंमध्ये, स्वयंपाकघरात लागणारी भांडी, हत्यारे, हुक्का, पिकदाण्या, कुलपे, गंजिफा आणि चौपाई आदी वस्तू आहेत. या वस्तू लाकडाच्या, दगडाच्या आणि धातूच्या असून त्यावर विविध नमुने आणि कलाकृती कोरल्या आहेत .

लाजबाब कलाकौशल्य आणि कारागिरीने सर्वोत्कृष्ट कलाकृती निर्माण करून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारसा अधिकधिक वैभवशाली आणि संपन्न करणाऱ्या ह्या महान कलावंताचे आणि कारागिरांचे आजच्या महाराष्ट्रावर फार मोठे ऋण आहे. कारण, त्यांनी निर्माण केलेल्या कलाकृती केवळ कलेचे सर्वोत्कृष्ट नमुने आहेत एवढेच नव्हे तर ती संस्कृतीची आणि कलेची स्फूर्तिस्थाने आहेत.


ध्ययुगीन स्मारके

शंकर मेनन

महाराष्ट्र(Maharashtra State,India)

पर्वताच्या उंचच रांगा आणि खोल दऱ्या पाहिल्या की कोणाचीही छाती दडपून जाते. दार्जिलिंग येथे टायगर हिलवर सूर्योदयाच्या वेळी हिमालयाच्या उंच उंच शिखरांवरून मेघ विरत जाऊन दऱ्याखोरी व समोरच्या पर्वतराजी दिसू लागतात तेव्हा पर्यटकाच्या तोंडातून विस्मयामुळे शब्द फुटत नाही, हातातल्या चहाचा कप तसाच रहातो. निसर्गदृश्ये रंगविणारा चिनी चित्रकार असे दृश्य पाहिल्यावर निसर्गापुढे आपण किती क्षुद्र आहोत या विचाराने अंतर्मुख होतो. परंतु, याउलट, मराठा वीरांनी अशाच दऱ्याखोऱ्यांना आणि पहाडांन आपणापुढे नमविले. सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांचा आणि पठरांचा उपयोग तटबंदी आणि किल्ले बांधण्यासाठी करून मध्य आशियातील गवताळ प्रदेशातून आलेल्या आक्रमाकाना थोपवून हिंदुपद पातशाहीच्या स्थापनेसाठी आपल्या छातीचे कोट केले.

आज महाराष्ट्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशाच्या मध्ययुगीन इतिहासाने छत्रपती शिवाजीच्या वैभव काळात गड-लिल्ल्यांच्या वास्तुशिल्पकलेचे व बांधकामांचे गौरवास्पद ननुने पाहिले. तथापि स्न १६४६ मध्ये, आपल्या वयाच्य अवघ्या १६ व्या वर्षी आपल्या नावाची मुद्रा करूनआपली सत्ता प्रस्थापित करण्यास शिवाजीने प्रारंभ केला तेव्हापासून इ. स. १६८० मध्ये त्यांचे निधन झाले तोपर्यंतच्या कालखंडात त्याने अनेक किल्ले बांधले हे खरे असले तरी त्याआधीपासून देखील महाराष्ट्राच्या किनारी प्रदेशात व पश्चिमेकडील पठारी प्रदेशात किल्ल्यांचे फार मोठे जाळे होते अशी इतिहासाची साक्ष आहे. किल्ल्यांसारख्या वास्तूंचे बांधकाम करता येण्याजोगा भूप्रदेश निसर्गानेच निर्माण केला होता. फार फार पुरातन काळी डोंगराची खोरी भरून जाऊन पठारी व मैदानी प्रदेश निर्माण झाला होता. तदनंतरच्या हजारो वर्षात ऊन-पावसाचा मारा खाऊन त्यातील ठिसूळ खडक घळत गेले तरी कठिण भाग कायम राहिला आणी महाराष्ट्राच्या भूप्रदेशाला विचित्र असे उंचसखल रूप प्राप्त झाले. सध्या जेथे मुंबई आहे तेथेपासून दक्षिणेकडे गोव्यापर्यंत समुद्रकिनाऱ्यापासून फार दूर नाही अशा सह्याद्रीच्या रांगा तयार झाल्या आणि किल्ले बांधण्याचा दृष्टीने उत्कृष्ट परिस्थिती निर्माण झाली. भारताच्या द्वीपल्पीय प्रदेशावर सत्ता गाजविणाऱ्या अधिपतीनी तिचे मर्म ओळखून या भौगोलिक वैविध्याच पुरेपूर उपयोग करून घेतला. या खडकाळ प्रदेशापासून नजिकच असलेल्या समुद्राकडे खाड्यांच्या किंवा नद्यांच्या मुखांशी किल्ले बांधून सभोवारच्या प्रदेशातून जाणाऱ्या नजर ठेवणे किंवा त्यांच्या हालचालींन रोखणे शक्य झाले.
महाराष्ट्राच्या ह्या दोंगरी प्रदेशात मोठमोठ्या शिलाखंडांवर किनाऱ्यालगतच्या प्रदेशात, इतकेच नव्हे तर खुद्द समुद्रातही प्राचीन काळापासून बांधलेले ३५० हून अधिक किल्ले आहेत. कान्हेरी, अलिबाग, रेवदांडा, जंजिरा, बाणकोट, जयगड, रत्नागिरी, देवगड आणि सुवर्णदुर्ग ही त्यांची काही उदाहरणे. हे बहुतेक सर्व किल्ले शिवाजी राजांनी बांधले अशी सर्वसामान्यांची समजूत असली तरी तशी वस्तुधिती नाही ए वर सांगितलेच आहे. दुर्ग या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे `जाण्यास कठिण जागा' आणि किल्ला हा शब्द त्याच्या समानार्थी वापरला जातो. सह्य पर्वतराजीमधील दुर्गम ठिकाणावरून किल्ले बांधण्याची कल्पना सुचली असावी. वेदांमध्ये देखील दुर्गांचा उल्लेख आढळतो आणि वास्तुशिल्पाशास्त्रावरील शिल्पशास्त्र या प्राचीन ग्रंथात स्वसंरक्षणासाठी म्हणून कश्यपांनी विकासित केलेल्या मूळ कलेचे, तटबंदी, खंदक, चर आणि संरक्षणाच्या अन्य पद्धतींनी युक्त सामुदायिक संरक्षणाच्या अन्य पद्धतीनी युक्त सामुदायिक संरक्षणाच्या कलेत कसे रुपांतर झाले त्याचे वर्णन केलेले आहे.
शिवाजीचा जन्म ज्या शिवनेरी किल्ल्यावर झाला तो ख्रि. पू. तिसऱ्या शतकात बौद्धांच्या ताब्यात असावा. त्या किल्ल्यातील भिंतीव्रील कोरीव लेख आणि तळी यावरून असा तर्क करता येतो. शिवाई देवीच्या मंदिराचे तळघर एका बौद्ध गुंफेच्या माथ्यावर आहे. काही शतकांनी बौद्धधर्मविरोधी जनमत तयार होऊन श्रीमत्‌ शंकराचार्याचा ब्राह्मणी संप्रदायाचे महत्त्व या भागात वाढले असावे असे त्या काळातल्या वास्तुशिल्पांवरून वाटते. रेडी येथील किल्ल्यातील गणपतीची मूर्ती, तसेच त्या किल्ल्याच्या तळघरात सापडलेले मूर्तीचे भग्नावशेष, यावरून तो किल्ला ब्राह्मणी संप्रदायाच्या एकाद्या अधिपतीच्या स्वामित्वाखाली असावा असे दिसते. महाराष्ट्रातील किनारी व पठारी प्रदेशात आढळणारे अनेक किल्ले कलचुरी, आंध्रभृत्य शिलाहार आणि यादव राजवंशांतील हिंदू राजांनी बांधलेले असावेत; तर पन्हाळा व सातारा येथील किल्ले शिलाहार राजवंशातील राजा दुसरा भोज याने बांधलेले असावेत. पुढे अकराव्या ते तेराव्या शतकापर्यन्तच्या दोनशे वर्षात दख्खनमध्ये इस्लामि सत्ता आल्यावर ह्या किल्ल्यांच्या आवारात खास शैलीची बांधकामे करण्यास सुरुवात झाली. त्यामुळेच त्यांच्या बांधकामात व प्रांगणांच्या स्वरूपात मुसलमानी छाप स्पष्ट दिसते. शिवाजीने हे किल्ले जिंकून त्यांची डागडुजी व सुधारणा करून आपल्या कल्पनेप्रमाणे त्यांना नवे रूप दिले; रायगड, पुरंदर, सिंहगड, विजयदुर्ग, यासारखे किल्ले त्याची साक्ष देतात. मालवणचा सिंधदुर्ग आणि सज्जिलकोट यासारखे किल्ले त्याने स्वतः बांधले.
महाराष्ट्रातील किल्ल्यांचा इतिहास पाहू गेले तर त्यापैकी बरेच शिवाजी राजांच्या उदयापूर्वी अस्तित्वात असले तरी त्या महान योद्ध्याने आपल्या राज्यस्थापनेच्या प्रयत्नात त्यांचा पूर्ण उपयोग करून घेतला. त्याच्या यशामधील या किल्ल्यांन वाटाही महत्त्वाचा होता. स्वराज्या स्थापनेच्या प्रयत्नात शिवाजीच्या मावळ्याना हे किल्ले त्यांच्या गनिमी काव्याच्या लढ्यात शत्रूवर हल्ला चढविण्याकरता, लपून छपून बसण्याकरता आणि प्रसंगी शत्रूवर चढाई करण्यासाठी चांगले उपयोगी पडले. शिवाजीचे रणकौशल्य हा भारतीय सैनिकी इतिहासात एक आख्यायिकांचा आणि प्रसंगी शत्रूवर चढाई करण्यासाठी चांगले उपयोगी पडले. शिवाजीचे रणकौशल्य हा भारतीय सैनिकी इतिहासात एक आख्यायिकांचा आणि दंतकथांचा विषय बनला आहे. तोरणा, रायगड, प्रतापगड, रांगण, पुरंदर आणि सिंहगड हे किल्ले तर, पुढे पेशव्यांच्या काळात लढायांचे क्षेत्र किल्ल्यांकडून व डोंगरी मुलखाकडून मैदानी प्रदेशाकडे सरकले, तोपर्यंत उपयोगी पडत असत.
भु-प्रदेशाच्या वैशिष्टयांन धरून हे बहुतेक किल्ले मुख्य लष्करी वाहतूक मार्गावर बांधलेले आढळतात. उदाहरणार्थ, मनमाड ते अहमदनगर मार्गावरील अंकाई-तंकाई, थळ खिंडीवर नजर ठेवण्यासाठी बलवंतगड, नाना खिंडीजवळील जीवधन, चंदर आणि हडसळ किल्ले, कोकणच्या दुर्गम प्रदेशावर लक्ष ठेवणे सोपे जाण्यासाठी बांधलेला किल्ले रत्नागिरी, साताऱ्याजवळील अजमगड आणि पुण्याजवळील पुरंदर हे किल्ले असेच जवळपासच्या वाहतूक मार्गावर नजर ठेवण्यासाठी बांधले गेले असावेत.
मराठी इतिहासाच्या प्रारंभीच्या काळात जे सुमारे ३५० किल्ले अस्तित्वात होते त्यांची वर्गवारी स्थूल मानाने तीन प्रकारात करता येते. ती अशीः विरीदुर्ग (डोंगरी किल्ले) जलदुर्ग आणि भूईकोट, याखेरीज निवासस्थानांभोवती तटबंदी असणाऱ्या ठिकठिकाणच्या गढ्या.
गिरीदुर्ग
सह्य पर्वताच्या रांगांमध्ये जेथे शिखरावर पुरेसा सपाट प्रदेश आढळला तेथे नैसर्गिक भू-रचनेचा शक्य तितक्या चांगल्या प्रकारे उपयोग करून घेऊन हे गड-किल्ले बांधण्यात आलेले आहेत चढण्यास कठिण असे कडे सर्व बाजूंनी असल्याकारणाने फार कडेकोट तटबंदी करण्याची गरज नसे. सिंहगड, पुरंदर, सातारा, पन्हाळ आणि इतर बरेच किल्ले असे नैसर्गिक संरक्षण लाभलेले आहेत. दुरून बघायला ते फार भव्य व प्रेक्षणीय दिसतात आणि त्यांच्या बांधणीत वास्तुशिल्पीय कौशल्यही आढळते. उदा. सध्या जेथे पि. डब्ल्यु. डी. खात्याचे विश्रामगृह आहे तो पन्हाळ किल्ला डोंगराच्या पायथ्याशी उभे राहून बघितला तर डोंगरच्य कडेवर बांधलेला एक साधा किल्ला वाटतो, परंतु वर जाऊन पाहिले की तीन दरवाजांच्या कमानी, कोठाराचा दर्शनी भाग आणि चर दरवाजाचे विविध भाग यावर कोरलेली शोभिवंतकलाकुसर स्पष्ट दिसते. त्याच्या प्रचंड भिंती, स्नानासाठी बांधण्यात येणाऱ्या घाटांच्या स्वरूपातील तेथील तळी, दीपमाळांसह असणारी मंदिरे ही वास्तुशिल्पीय वैविध्याची व परिपूर्णतेची साक्ष देतात.
अधिक संरक्षणासाठी म्हणून बऱ्याचदा एका मागे एक भिंतीच्या रांगा बांधीत. उदाहरणार्थ, पन्हाळा किल्ल्यांवर अशा जाड व भक्कम भिंतीच्या तीन रांगा आहेत. चांदण्या रात्री तारे दिसत असताना, नीरव शांततेत, बाहेरच्या व्हरांड्यात गस्त घालणाऱ्या चौकीदाराच्या घुंगरे लावलेल्या काठीच खुळखुळ आवाज ऐकला की त्या मराठेकालीन लढायांच्या प्रतिध्वनी तर नव्हे असा भास होत राहतो. या किल्ल्यांना पाण्याची सोय त्यामध्ये बांधलेल्या तळ्यांमुळे होत असे.
जलदुर्ग
जलदुर्ग स्थानिक भाषेत जंजिरा म्हणतात. जंझिराह या अरबी शब्दाचे ते अपभ्रष्ट रूप आहे. हे किल्ले बऱ्याचदा मुख्य भूमील जवळ असणाऱ्या बेटावर बांधण्यात येत. अशा किल्ल्यांमुळे समुद्रमार्गे येणाऱ्या शत्रूची टेहेळणी करणे शक्य होत असे आणि शिवाय वेळप्रसंगी किल्ल्यातील लोकांना मुख्य भूमीवर पळून जाणे शक्य होई. इतर जलदुर्ग जवळपास खाडी किंवा नदी असलेल्या खडकाळ समुद्रकिनाऱ्यावर बांधले जात. बाणकोट, गोपाळगड, जयगड, देवगड, रत्नागिरी, विजयदुर्ग आणि अलिबाग हे किल्ले पहिल्या प्रकारात तर वराई तालुक्यातील अर्नाळा, रायगड जिल्ह्यातील जंजिरा आणि मालवण येथील सिंधदुर्ग हे दुसऱ्या प्रकारात.
कोकण किनाऱ्यावरील या सर्व किल्ल्यांवरून एका बाजूला फार मोठे सागरी क्षेत्र नजरेच्या टप्प्यात येते तर दुसऱ्या बाजूला फार मोठ्या पठारी प्रदेशावर नजर ठेवणे शक्य होते. खाडीच्या किंवा नदीच्या मुखाशी असल्याने ते सागरी वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यास उपयोगी पडत; तसेच खाडीतून किंवा नदीमुखापासून अंतर्गत प्रदेशाकडे जलमार्गे जाणाऱ्या शत्रूला तोफा डागून रोखणे शक्य होत असे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे किल्ल्याच्य तटबंदीच्य आतही मोठाने चर किंवा खंदकही खणलेले असल्याचे आढळून येते. विजयदुर्ग आणी रेडी येथील किल्ल्यांच्या आवारात भक्कम खडक फोडून तयार करण्यात आलेल्या खंदकामुळे शत्रूला किल्ल्याच्या सर्वात आत असणाऱ्या अशा महत्त्वाच्या बालेकिल्ल्यापर्यंत पोहोचणे सहज शक्य होत नसे. तसेच किल्ल्याच्या आत असणारे वाडे, महाल, मंदिरे आणि इतर वस्ती यांचेही संरक्षण होत असे.
दुसऱ्या प्रकारातील बेटांवर उभे केलेले जलदुर्ग समुद्र किनाऱ्यापासून काही थोड्या अंतरावर बांधले जात. त्यामुळे ओहोटीच्या वेळी मुख्य भूमीपासून किल्ल्यावर चालत जाता येत असे. अशा प्रकारे हे किल्ले गावचाच भाग असे वाटण्याइतके जवळ असल्यामुळे तेथून सभोवतालच्या भूप्रदेश नजरेच्या टप्प्यात येत असे. तसेच शत्रूच्या हालचालीवर लक्ष ठेवता येत असे. शिवाय शत्रूची जहाजे तोफांच्य माऱ्याच्या टप्प्यात येईपर्यंत त्यांचे अस्तित्व शत्रूच्या लक्षात येत नसे. समुद्रसपाटीवर असल्याने किल्ल्यातील लोकासाठी तो सोयीचे असत. शिद्दीच्या ताब्यातील जंजिर काबीज करण्यासाठी केलेल्या चढाईत शिवाजील अशा किल्ल्यांचे महत्त्व लक्षात आले. म्हणून त्याने मालवण नजीक सिंधदुर्ग बांधला. मागाहून त्याच्याच जवळ सर्जेकोट बांधून त्या किल्ल्यास अधिक संरक्षण दिएल. जंजिरा व अर्नाळा किल्ल्यांचा उपयोग शिवाजी महाराजांच्या अस्तानंतर चांच्यानी आपले अनिष्ट उद्योग चालवण्यासाठी सुरक्षित ठिकाणे म्हणून केलेला आढळतो.
भुईकोट
भुईकोट बांधण्यासाठी उंचवट्याची जागा निवडण्यात येई आणि हे किल्ले मुख्यत्वे निवासस्थाने म्हणूनच बांधले जात. गावातून वा गावाजवळून जाणाऱ्या नदीच्या काठावर ते बांधलेले आढळतात त्यामुळे किल्ल्याच्या तटबंदीला नदीकाठाची नैसर्गिक शोभा प्राप्त होत असे आणि पाण्याची सोयही होई. संरक्षणाच्या दृष्टीने नद्यांची किनारपट्टी कृत्रिमरीत्या मजबूत करावी लागे आणि ही गरज या भुईकोटांच्या भिंतीत मधून मधून बांधलेल्या बुरुजानी भागत असे. शत्रू दिसलाच तर या तटबंदीत ठेवलेल्या माऱ्याच्या जागातून शत्रूवर तोफा डागता येत. तशीच वेळ आली तर पसार होण्यासाठी किल्ल्यत भूपृष्ठाखालून बांधलेले गुप्त भुयारी मार्गही असत.
नैसर्गिक तटबंदी किंवा अडथळे नसणाऱ्या भुईकोटांच्या बाबतीत सभोवार मोठा चर खणून जवळपासचा झरा, तळे किंवा नदी यांमधून पाणी घेऊन तो भरून काढीत. बांद्याचा किल्ला हे या प्रकारच्या भुईकोटाचे उत्तम उदाहरण आहे. दुर्दैवाने वास्तुशिल्पशास्त्र दृष्टया महत्त्वाचे असे या किल्ल्यातील एकही बांधकाम आज आस्तित्वात नाही. फक्त विजापूरच्या सुलतानांच्या वंशातील लोकांच्या काही कबरी आहेत. सिंधदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीचा किल्ला हे भुईकोटाचे आणखी एक अप्रतिम उदाहरण. त्याच्या मुख्य बांधकामा भोवताली असणारा खंदक १५० फूट रूंद आणि १००-२०० फूट खोल असून त्यामध्ये जवळच्या मोतीतलावातील पाणी सोडण्यात येई.
याउलट, सोलापूरच्या किल्ल्याला नदीचा फायदा मिळालेला नाही, त्याची वास्तुशिल्पात्मक वैशिष्टये मात्र इतर भुईकोटांसारखीच आहे. नैसर्गिक उंचसखलपणानुसार किल्ल्याच्या भिंती ३० ते ७० फूट उंच आहेत.
रेडी आणि विजयदुर्ग किल्ल्यांच्या भिंती ६०-८० फूट उंचीच्य आहेत. भिंतीची जाडी सुमारे १५ फूट आहे. अशा भक्कम भिंतीमुळे शत्रुला आतील शिबंदीवर एकदम व प्रत्यक्ष हल्ला करणे शक्य होत नसे हे तर खरेच, परंतु भिंतीच्या जाडीमुळे मारा करण्यासाठी तोफ बसविण्यासाठी भक्कम पाया मिळत असे.
मोठ्यामोठ्या भक्कम दगडांचा वापर करून बांधकामाच्या खर्चात बचत करण्यात येई. विटा व चुन्याचे काम आवश्यक तेथे करण्यात येई. बाहेरचा भाग सामान्यतः ३फुट जाडीचा व गच्चीच्या कडेला बांधण्यात येणाऱ्या ठेंगण्या भिंतीसारखा असे. त्यामुळे ऐन लढाईतही पहाऱ्यावरील संत्री व शिपाई यांना संरक्षण मिळत असे. मात्र पन्हाळा किल्ल्याच्या बाबतीत अशी संरक्षणात्मक तटबंदी आढळत नाही. हे आश्चर्य आहे.
अशा जाड भिंतीचा उपयोग आतल्या बाजूला कोठे कमी जाडी ठेवून हत्ती व घोडे बांधण्यासाठी, गुप्त खजिना ठेवण्यासाठी, गुप्त जागा तयार करण्यासाठी किंवा लपण्यासाठी जागा करण्यासाठी केला जाई. तसेच त्यांच्यामधून गुप्त मार्गाने जाण्यासाठी भुयारेही काढण्यात येत.
सुमारे ३० ते ५० फूट व्यासाचे अर्धवर्तुळाकार बुरुज या तटाला अधून मधून बांधलेले असत. त्यांच्यामुळे सर्व बाजूंना टेहेळणी, मारगिरी आणि हल्ला करता येई. बुरुजाच्या प्रत्येक दाराला पाच झरोके असत. आणि बुरुजांवर भारी तोफा चढविण्यात एत. हे बुरुज भिंतीच्या इतर भागापेक्षा मजबूत असण्याची गरज असल्याने तेथे भूमीगत खडकांच पायासारखा उपयोग करून त्यावर बांधण्यात येत. मालवण येथील किल्ल्याच्या बुरुजांच्या बाबतीत ही गोष्ट विशेषत्वाने आढळून येते. तेथील बुरुज एकमेकाशी अशा नागमोडी रचनेने जोडलेले आहेत की किल्ल्याचा मुख्य दरवाजा नक्की कोठे आहे ते सहजासहजी लक्षात येत नाही.
या किल्ल्यांचे आणखी एक वैशिष्टय असे की, त्यांच्य तटाच्या कडेने ठेंगणी व ५-६ फूट जाडीची भिंत बांधलेली असून मधूनमधून २ते४ झरोके ठेवलेले असत. ते अशा प्रकारे आतून जोडलेले अस्त की भिंतीच्या आड लपून एक सैनिक एकाच वेळी मारगिरी करू शकत असे. याउलट काही काही वेळा ३-४ झरोक्याना बाहेरच्या एकच तोंड असे. त्याचा उपयोग ३-४सैनिकांना एकाच ठिकाणाहून मारगिरी करण्यासाठी होई.
या किल्ल्यांच्या वास्तुशिल्पकलेचे महत्त्वाचे अंग म्हणजे त्यांचे प्रवेशद्वार. भक्कम भिंतीच्या रांगांच्या दोन्ही बाजूंन जाण्यायेण्यासाठी द्वारे ठेवलेली असत. विजयदुर्ग किल्ल्याला अशी तीनद्वारे आहेत. रेडीला पाच तर सिंधुदुर्गासारख्या पश्चिम किनारपट्टीवरील बऱ्याच किल्ल्यांना एकच प्रवेशद्वार आहे. दोन शक्य तितक्या उंचीवर आणि बाहेरच्या बाजूने अजिबात दृष्टीला न पडणारे असे. बुरुजामधील मारगिरीच्या झरोक्यांतून मुख्य प्रवेशद्वाराकडे येणार मारग स्पष्ट दिसावा अशा प्रकारे त्यांची रचना रुंदीचा असे. प्रवेशद्वाराचे दोन्ही दरवाजे, (फळ्या,) भक्कम धातूचे असून त्यावर अणकुचीदार खिळे ठोकलेले असत ही द्वारे फोडण्यासाठी धडका मारण्याकरिता वापरल्या जाणऱ्या हत्तीनीही तसे करण्यास धजू नये या हेतूने व्यवस्था होती.
या बांधकामामध्ये सामान्यतः बसाल्ट, लाल जांभा दगड किंवा मध्यम प्रतीच ग्रॅनाइट प्रकारचा दगड वापरला जात असे. पाटीचा दगडही वापरला जाई. मालवणचा सिंधुदुर्ग तर फक्त ग्रॅनाइट दगडाचे बांधलेला आहे. पश्चिम किनारपट्टीतील बहुतेक सर्व किल्ले लाल जांभ्या दगडानेच बांधलेले आहेत. हा दगड काळवथरी दगडापेक्षा नरम असल्याकारणाने उत्तम ताशीच काम करता येत नसे. इतकेच नव्हे त्याच्या अंगभूत दोषामुळे या सर्व किल्ल्यांच्या बांधकामावर वारा-वादळे व पावसाने खूपच अनिष्ट परिणाम झाला आहे.
शिवाजील अनायासेच मालवणाचे खडकाळ बेट ग्रॅनाईट दगडाने भरलेले आढळले आणि अर्थातच आपला सिंधुदुर्ग त्याने दगडाने बांधला. पन्हाळ्याला `निळा बॅसॉल्ट' हा दगडाचा प्रकार वापरलेला आहे आणि म्हणून आजसुद्धा तो किल्ला बऱ्याच शाबूत स्थितीत आहे.
अभिजात प्रासाद वास्तुशिल्प
अठराव्या शतकाच्या आरंभापासून एकोणिसाव्या शतकापर्यंतच्या, पेशव्यांची सत्ता असेतोपर्यंतच्या काळात, गड-किल्ल्यांऐवजी निवासासाठी मोठमोठे प्रासाद बांधण्याच्या कलेचा खूपच विकास झालेला आढळतो. सधन मराठा सरदारंनी स्वतः भव्य व टोलेजंग वाडे बांधले. त्याआधीच्या धामधुमीच्या काळात अशा प्रासादतुल्य इमारती बांधणे शक्य नव्हते आणि त्याची भरपाई जणू या काळात मराठा सरदारांनी शोभिवंत व भव्य निवासस्थाने बांधून केली.
वाडा हा शब्द केवळ राजवाडा या अर्थी वापरला जात नसून श्रीमंत, व्यापारी, सावकार इ. सधन वर्गातील लोकांच्य प्रशस्त हवेल्यांनही वाडा म्हटले जाते. किंबहुना या नवीन धाटणीच्या वास्तुशिल्पकलेच्या विकासास त्यावेळच्या सावकार वर्गाचा बराच हातभार लागत आहे.
धन्याची संपत्ती, वाड्याची जागा आणि बांधकाम साहित्य यानुसार वाड्याचा आकार आणि त्याची सजावट यात फरक आढळत असला तरी वास्तूचे एकंदर स्वरूप व रचना एकसारखी असे. नंतरच्या काळातील मराठा वाडे आधीच्या अशा वड्याहून फ़ारसे भिन्न नाहीत . बांधकाम तंत्रातील सातत्य त्यावरुन दिसून येते. वाड्यातील चौक आणि लाकडी (फ़्रेमवर्क) यातही परंपरा दिसून येते. महाराष्ट्रात बांधकामासाठी वापरलेल्या साहित्यामुळेही बांधकामाच्या परकी तंत्राच्या प्रभावाचे खास दख्खनी शैलीत रुपांतर झालेले आढ्ळते. दगडाऐवजी लाकडामधे कोरीव काम केल्यामुळे वाड्यातील तक्तपोशींना एक प्रकारची भव्यता येई. महाराष्ट्रातील बरेच वाडे सातारा, कोल्हापूर, पुणे, वाई आणि नाशिक या ठिकाणी बांधन्य़ात आएल. राज्स्थानमधील हवेलीच्या तुलनेत महाराष्ट्रातील वाडे वास्तुशिल्पकलादृष्टया साधेच आहेत. युरोपीय प्रासादांप्रमाणे या वाड्यांच्या सभोवार हिरवळ आणि बागा नाहीत किंवा मोगल प्रसादांप्रमाणे हवेशीर गच्च्या नाहीत. प्रासादासभोवार बांधलेली संरक्षक भिंत काळ्य़ पत्थराची, भाजलेल्या विटांची असे आणि तिला गवाक्षे व प्रवेशद्वारे असत. द्वाराच्या दोन्ही दरवाजांन पोलादी पत्रे बसविलेल्या जाड लाकडाची मोठी झडपे (शटर्स) असत. आणि ती विशिष्ट प्रसंगीच उघडाली जात. प्रवेशद्वारापाशी दोन्ही अंगास रक्षकाच्या जागा असत, त्यांच देवडी म्हणतात. दिवाबत्ती व शस्त्रात्रे ठेवण्यासाठीही त्यांचा उपयोग होई. या देवड्या बऱ्याचदा हनुमान, गरूड, द्वारपाल किंवा हिंदू पौराणिक कथांपैकी देवदेवतांची चित्रे काढून सुशोभित केलेल्या असत. काही वाड्यांच्या बाबतीत वाड्याबाहेर देवडी असे. उदा. पुणे येथील विश्रामबाग वाडा. बाहेरून पाहिले असता वाड्यांचा आकार चौकोनी किंव काटकोन चौकोनी असे आणि आत चौकोनी अंगणाच्या बाजूने इमारती बांधलेल्या असत. त्या मोकळ्या जागांणा चौक म्हणत.
या वाड्यांना निरनिराळ्या हेतूने एकाहून अधिक प्रवेशद्वारे असत. शनिवार वाड्याचा मस्तानी दरवाजा पहिल्या बाजीरावाची मुस्लिम प्रेयसी मस्तानी हिला खूष करण्यासाठी खास तयार केलेला होता. त्या दरवाजातून तिला पाहिजे तेव्हा प्रवेश करता येई तसेच बाजीरावाच्या इतर कुटुंबियांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाण्याचेही त्यामुले टळे. अनेक प्रवेशद्वारांच्या वरील भागात कोरीव काम केलेले असे.
वाड्यांच्य आत म्हणजे चौकोनी मोकळ्या जागेछ्या सभोवार, वाड्याचे बांधकाम असे आणि अशा चौकांच्या संख्येवरून वाड्याचा मोठेपणा गणला जाई. चारचौकी, आठचौकी इ. अशा एकेका चौका भोवतालच्या दालनातून चित्रे, नक्षीकाम इ. सजावट केलेली असे. काही दालने विविक्षित कार्यासाठी म्हणजे धार्मिक समारंभ व इतर कार्यक्रम साजरे करण्यासाठी म्हणून विशेष सुशोभित केकेली असत.
श्रीमंत लोक काचेचे दिवे, हंड्या, मोमदाने, झुंबरे इत्यादी वाड्याची शोभा वाढवीत. भिंती आणि छत या ठिकाणी आरसे बसवून तयार केलेला आरसे महाल हा वाड्यातील सर्वात प्रतिष्ठेचा भाग असे. बेताची सांपत्तिक स्थिती असणारे देखील शयन दालनात किंवा बैठकीच्य दालनास तरी भिंतीवर आरसे बसविण्याची आकांक्षा बाळगीत, बऱ्याच वाड्याना अस्मानी महाल म्हणून ओळखले जाणारे एकादे दालन असे. हा भाग वाड्याचा इतर भागापेक्षा अधिक उचीचा असे. पेशव्यांच पुण्यातील शनिवार वाडा सात मजली होता व बहुतेक वाड्यांमध्ये जमिनीखाली साठवणीच्या जागा असत. तेथे शस्रास्त्रे व दारुगोळा साठवला जाई. अशा प्रकारचे सर्वांत मोठे तळघर चांदवडच्या राजवाड्यात आढळते. वाड्याच्या एकूण जोत्याएवढे त्याचे क्षेत्रफळ आहे.
दिवाणखाना, शयन दालन आणि समारंभाचे दालन यांच्या भिंतीवर तसेच पूजादालनात भारतीय महाकाव्यांतील प्रसंग चितारलेले असत, वाड्यांची रचना, चित्रकारी आणि सजावट यांतील सूक्ष्म फरकावरून वाड्याचा धनी ब्राह्मण, लढवय्या मराठा की सावकार-व्यापारी पेशाचा आहे हे समजून येई. शनिवारवाडा, रास्ते वाड, चिमणबाग इ. वाड्यांतील कारंजी मोगल प्रभाव दर्शवितात. अगदी अलीकडेपर्यंत म्हणजे पन्नास वर्षांपूर्वीपर्यंत राहाण्याच्या जागांसाठी वाड्याचे रेखाटन व बांधणी लोकप्रिय होती.
मंदिरे
तेराव्या शतकात दख्खनमधे इस्लामी सत्ता स्थिर झाल्यावर धार्मिक वास्तुशिल्पकलेच्या अभिजात परंपरेचे पाऊल मागे पडले. सत्ताधीशांच्य विरोधी वृत्तीमुळे हिंदू धार्मिक मूर्तीचे प्रदर्शन करने अशक्य झाले. नवीन देवळे तर बांधली गेली नाहीतच. परंतु जुन्यांच्य डागडुजीकडेही पाहिजे तितके लक्ष दिले गेले नाही. पुढे तीनशे वर्षांनंतर मराठा राज्यकर्त्यांनी आपले प्रभुत्व पुनः प्रस्थापित केल्यानंतर आपल्य धर्मस्थानाचे व मंदिराचे नूतनीकरण करण्यास तसेच नव्याने बांधण्यास हिंदूनी प्रारंभ केला. मंदिर वास्तुशिल्पकलेची परंपरा पुनः पुनरुज्जीवित झाली आणि त्याच प्रत्यय मराठाकालीन मंदिरांतून येऊ लागला.
मराठाकालीन मंदिरे, इस्लामी आक्रमण येण्याआधी आस्तित्वात असलेल्या यादव परंपरेवर आधारित होती. तथापि लवकरच ही शैली. या मंदिरांचे नवीन आश्रयदाते बनलेले मराठा सैनिक व सरदार-दरकदार यांच्या अपेक्षा पुऱ्य करण्यास अपुरी पडू लागली. मराठी सत्तेच्या विस्तारामुळे मराठा सैनिक व सरदार यांनी भारताच्या निरनिराळ्या भागातील मोहिमांच्य वेळी, भिन्न भिन्न कलात्मक परंपरा पाहिल्या होत्या. आणि म्हणून त्यांच्या उदाअ आश्रयाखाली झालेल्या नवीन मंदिरांच्या बांधकामात उत्तर आणि दक्षिण भारतीय शैलींचा मिलाफ होऊन एक नवीन शैली साकार झाली.
ह्या मराठाकालीन मंदिरांची रचना साधी आढळते. चौकोनी गर्भगृह, पुढे प्रवचे-कीर्तने यासारख्या कार्यक्रमांन जमणाऱ्या लोकांन बसण्यासाठी प्रशस्त सभामंडप हे मुख्य भाग.
सभामंडप म्हणजे एक खुले प्रेक्षागृहच. शोभिवंत कोरीव काम व नक्षी काढलेल्या स्तंभावर तो उभा असतो. स्तंभ एकमेकांना कमानीनी जोडलेले असतात. हे स्तंभ व वरील छत यामुळे मंदिराच्या अंतर्भाग मोठा शोभिवंत दिसतो.
मंदिरांचा विशेष नजरेत भरणारा भाग म्हणजे निमुळता होत गेलेला कळसाच भाग. तो निमुळता होत जाताना मध्ये प्रत्येक मजला स्पष्टपणे दिसतो. प्रत्येक मजल्याच्य बाहेरील बाजूस कोनाडे व एक सोडून एक छोटे छोटे मनोरे असत. कोनाड्यातून देवादिकांच्या किंवा पौराणिक कथांतील मूर्ती असत. सर्वात वरचे टोक घुमटाकार भागातून वर आलेले असे. कळसापर्यंतच्या या बांधकामात वर म्हटल्याप्रमाणे चढत, निमुळता होत जाणारा कळस ही बाब दक्षिण भारतीय वास्तुशिल्पेतून उचललेली असावी, तर कोनाडे व मनोरे इ. कलाकुसर उत्तर भारतीय छाप सांगते.
महाराष्टातील मंदिरासमोर दीपमाळ असल्यावाचून ते पुरे होत नाही. वर निमुळाता होत गेलेला स्तंभ आणि त्याला सभोवार अंतरा-अंतराने दिवे लावण्यासाठी कोनाडे किंवा बाहेर आलेले हात यामुळे हे बांधकाम एकंदर मंदिरवास्तुशिल्पता शोभा देते. दीपमाळा बऱ्याचदा दगडांची बांधलेल्या असत तर क्वचित स्टुको या चुना-रेतीच्या गिलाव्याने मढविलेल्या असत.
काही महत्त्वाच्य मंदिरांना विस्तीर्ण आवारे असून सभोवार जाड भिंतीची तटबंदी आहे. भिंतीच्या आतल्या बाजूस कमानीदार ओवऱ्या काढलेल्या आढळतात. परगावहून येणाऱ्या यात्रेकरूना उतरण्यासाठी त्यांचा उपयोग होत असे. डोंगरमाथ्यापर्यंत अशा मंदिरांची तटबंदी मंदिराला एकाद्या किल्ल्याचे रूप देते.
बऱ्याचदा मंदिरे नदीकाठी बांधलेली आढळतात. ह्या मंदिरांसमोर नदीपर्यंत जाणाऱ्य पायऱ्यापायऱ्यांचे घाट बांधलेले घटक आहेत. वाई, टोके व नाशिक येथे मंदिरानजीक नद्यांच्या तीरावर प्रशस्त फरसबंदीही केलेली आढळते. उत्सवांच्या व जत्रांच्या दिवशी यात्रेकरूंची गर्दी उसळते तेव्हा रात्रीच्या वेळी ते दृश्य मोठे रम्य दिसते.
जे भाविक स्वतः मंदिरे बांधू शकत नसत ते देवळांच्या प्रांगणातील दीपमाळा बांधण्यासाठी धन देत. मराठाकालीन मंदिरांच्या साधेपणातील सौंदर्य हे ती बांधऱ्यांच्य सांस्कृतीक व सौंदर्यवादी मूल्यांचे प्रतीकच म्हणायला हवे.


No comments:

Post a Comment

Followers

Info@nashik

Nashik, Maharastra, India
ठरवलं ना एकदा… मागे वळुन पुन्हा, आता नाही बघायचं… विसरलेल्या आठवणींना, आता नाही आठवायचं… चुकार हळव्या क्षणात, आता नाही फसायचं… अपेक्षांचे ओझे आता, मनावर नाही बाळगायच… नागमोडी वळणावर आता, नाही जास्त रेंगाळायचं… निसरड्या वाटेवर आता, नाही आपण घसरायचं… स्वतःच्या हाताने आता, स्वतःला सावरायचं… नी स्वतःचे आयुष्य, स्वतःच आपण घडवायचं…